For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक दगडही उचलण्यास मनाई

06:25 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक दगडही उचलण्यास मनाई
Advertisement

भुताटकीयुक्त शहराशी जोडलेला आहे शाप

Advertisement

अमेरिकेत एक असे शहर आहे, जेथे कधीकाळी हजारो लोकांची गर्दी असायची, रस्ते लोकांनी बहरलेले असायचे, अनेक बार अन् हॉटेल्स चालविली जात होती आणि सोन्याच्या शोधात दूरवरून लोक येथे पोहोचायचे, परंतु आता येथे नीरव शांतता आहे. रस्ते खाली असून घरे मोकळी पडली आहेत. जुन्या वाहनांना गंज चढली असून हे ठिकाण आता घोस्ट टाउन नावाने प्रसिद्ध आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांना एक अजब इशारा दिला जातो. शहरातून कुठलीच सामग्री उचलून न नेण्याचा इशारा देण्यात येतो. जर कुणी येथील दगड, बाटली, खिळा देखील चोरला तरीही त्याच्यासोबत वाईट घडू लागते असे बोलले जाते. याला ‘बोडी कर्स’ म्हणजेच बोडीचा शाप असे म्हटले जाते. या शापामुळे काही लोक चोरी करण्यात आलेल्या गोष्टी परत घेऊन आले आहेत. तसेच माफीचे पत्रही त्यांनी लिहिले आहे. कुणी आजारासाठी याला जबाबदार ठरविले, तर कुणी नोकरी जाण्यासाठी आणि कार दुर्घटनेसाठी या शापाला जबाबदार ठरविले आहे.

Advertisement

सोन्याच्या शोधात वसलेले शहर

कॅलिफोर्नियाच्या सिएरा नेवादा पर्वतांमध्ये असलेल्या बोडीची कहाणी 1859 पासून सुरु होते. त्यावर्षी सोन्याच्या शोधात निघालेल्या लोकांनी येथे सोन्याचा मोठा साठा शोधला होता. यात विलियम एस. बोडी नावाचा व्यक्तीही सामील होता. याच व्यक्तीच्या नावावर पुढील काळात पूर्ण शहर वसले. तो स्वत: कधीच या शहराला पाहू शकला नाही. त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये सामान नेण्याच्या प्रवासावरून परतताना हिमवादळात त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले गेल्याने शहराचे नाव ‘बोडी’ पडले आणि हेच नाव कायमस्वरुपी टिकले असे सांगण्यात येते.

काही वर्षांमध्येच हजारोंची गर्दी

प्रारंभी बोडी एक छोटेसा मायनिंग कॅम्प होता, परंतु 1876 मध्ये स्टँडर्ड कंपनीला येथे सोने आढळले, यानंतर सोन्याच्या शोधात लोकांची गर्दी वाढू लागली. 1879मध्ये बोडीची लोकसंख्या जवळपास 7 हजार ते 10 हजारपर्यंत पोहोचली होती. शहरात सुमारे 2 हजार इमारती होत्या. याचा मुख्य रस्ता जवळपास 1 मैल लांब होता आणि येथे व्यापार वाढला होता. परंतु शहर जितके श्रीमंत झाले तितकेच बदनाम होत गेले, हत्या, गोळीबार, मद्याच्या नशेत भांडणे आणि स्टेचकोच लुटण्यासारख्या घटना सामान्य ठरू लागल्या.

गमावू लागले स्वत:चे महत्त्व

बोडीची चमक अधिक दिवसांपर्यंत राहिली नाही. 1880 च्या दशकापासून खाणींशी जोडले गेलेले लोक उत्तम संधीच्या शोधात इतर ठिकाणी जाऊ लागले, सोन्याचे उत्पादन घटल्यावर शहराची कमाईही कमी होऊ लागली. यानंतर आग, कडाक्याची थंडी आणि सातत्याने घटणाऱ्या नफ्याने बोडीला आणखी कमकुवत केले. 1932मध्ये लागलेल्या एका मोठ्या आगीने शहराच्या व्यापारी भागाचा मोठा हिस्सा नष्ट केला. मग दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या सरकारने अनावश्यक सोन्याच्या खाणी बंद करण्याचा आदेश दिला. बोडीची अखेरची खाण देखील 1942 मध्ये बंद झाली, यानंतर शहर जवळपास पूर्ण निर्जन ठरले.

घरांमध्ये आजही जुनी सामग्री

लोक ज्या अवस्थेत शहराला सोडून गेले होते, त्याच अवस्थेत बोडीला टिकविण्यात आलेआहे. 1962म ध्ये याला स्टेट हिस्टोरिक पार्कचा दर्जा मिळाला. याला ‘अरेस्टेड डिके’ म्हणजेच अशा स्थितीत संरक्षित करण्यात आले, जेथे जुनया इमारतींना त्यांच्या वर्तमान स्थितीत वाचविले जाते, यांना नवे रुप देत चमकाविले जात नाही. याचमुळे येथे फिरताना लोक अचानक स्वत:चे घर सोडून गेल्यासारखे वाटू लागते. जुन्या घरांमध्ये फर्निचर ठेवलेले आहे, दुकाने अन् खोल्यांमध्ये सामान असून अनेक ठिकाणी धूळ चढलेल्या प्लेट्स दिसून येतात.

शापाची कहाणी

बाडीच्या निर्जनतेसोबत येथे भूत आणि आत्म्यांच्या कहाण्याही प्रसिद्ध झाल्या. एका स्थानिक कहाणीनुसार बोडीच्या लाकडाने निर्मित मेथोडिस्ट चर्चमध्ये काही लोक आगीपासून वाचण्यासाठी लपले होते, तेव्हा त्यांनी आगीच्या ज्वाळांदरम्यान विलियम बोडीच्या आत्म्याला चालताना पाहिले. त्याच्या आत्म्याने ‘माझ्या वस्तूंना हात लावू नका’ असे म्हटल्याचे कहाणीत सांगण्यात येते.

चोरलेल्या वस्तू परत करण्याचा प्रकार

पर्यटकांनी चोरलेल्या वस्तू अनेकदा बोडीच्या पार्क कर्मचाऱ्यांना पोस्टने परत मिळाल्या आहेत. या दगड, बाटल्या आणि खिळे यासारख्या छोट्या गोष्टी सामील होत्या. याचबरोबर अनेकदा माफी मागणारी पत्रंही पाठविण्यात आली आहेत. काही लोकांनी बोडीमधून वस्तू नेल्यावर स्वत:च्या जीवनात वाईट गोष्टी घडू लागल्याचा दावा केला.

Advertisement
Tags :

.