For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलकाता घटनेनंतरही बंगालमध्ये ‘क्रौर्य’सत्र सुरूच

06:39 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोलकाता घटनेनंतरही बंगालमध्ये ‘क्रौर्य’सत्र सुरूच
Advertisement

महिलांवरील अत्याचाराची तीन नवी प्रकरणे उघड : दोन हॉस्पिटलमध्ये लैंगिक शोषण

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

कोलकात्याच्या आरजी कर कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येचे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच बंगालमध्ये मुलींवर अत्याचाराची तीन नवीन प्रकरणे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पहिली घटना बीरभूम जिह्यातील रुग्णालयातील असून तेथे एका रुग्णाने रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या नर्ससोबत लज्जास्पद कृत्य केले. दुसरी घटना हावडा येथील रुग्णालयातील असून एका 13 वर्षांच्या मुलीचा रुग्णालयातील तंत्रज्ञांनी विनयभंग केल्याची तक्रार नोंद झाली आहे. तर तिसरे प्रकरण उत्तर 24 परगणा येथील असून तेथे 9 वर्षाच्या मुलीवर अशाच क्रूरतेचे प्रकरण समोर आले आहे.

Advertisement

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्येनंतर संपूर्ण बंगालमध्ये लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचदरम्यान शनिवारी रात्री बीरभूम जिह्यातील इलामबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक नर्स रुग्णांच्या सेवेत असताना इमर्जन्सी उपचारासाठी आणलेल्या एका रुग्णाने नर्सला अयोग्यरित्या स्पर्श केला. याला विरोध केला असता त्याने शिवीगाळही केली. ही बातमी समोर येताच लोक संतापले. कर्मचाऱ्यांनी एकच गोंधळ घातल्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतरच आरोपीला अटक करण्यात आली.

9 वर्षांच्या मुलीशी गैरकृत्य

दुसरे प्रकरण उत्तर 24 परगणा येथील आहे. येथे एका व्यक्तीने 9 वर्षाच्या मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केले. लोकांना याची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला. लोक रस्त्यावर आले. टीएमसीच्या एका नेत्याने पीडितेच्या कुटुंबाला सेटल करण्याची कथित ऑफर दिल्याने प्रकरण अधिक तापले. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी टीएमसी नेत्याच्या घरावर हल्ला केला. आरोपींच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आरएएफ तैनात करावे लागले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तेथे अजूनही तणाव असून संपूर्ण परिसरात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

13 वषीय मुलीसोबत गैरवर्तन

तिसरे प्रकरण पश्चिम बंगालमधील हावडा येथील रुग्णालयातील आहे. येथील लॅबमध्ये काम करणाऱ्या एका टेक्निशियनने 13 वषीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार घेत असलेल्या मुलीला सीटी स्कॅनसाठी नेण्यात येत असताना रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. काही वेळाने मुलगी रडत बाहेर आली. तिने तंत्रज्ञाने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे कुटुंबीयांना सांगितले. बाहेर थांबलेल्या आईने आपल्या मुलीचा आरडाओरडा ऐकून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. हे वृत्त पसरताच अनेकांनी रुग्णालयात गर्दी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जमावाने आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

Advertisement
Tags :

.