For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एवलिन शर्माने घेतला घटस्फोट

06:56 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
एवलिन शर्माने घेतला घटस्फोट
Advertisement

विभक्त झाल्यावरही पतीसोबत करणार मुलांचे पालनपोषण

Advertisement

अभिनेत्री एवलिन शर्मा मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आहे. तिचा अखेरचा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2021 साली तिने इंडो-ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन तुषान भिंडीसोबत विवाह केला होता. त्यानंतर या दांपत्याला दोन अपत्यंही झाली. परंतु आता एवलिन आणि तुषान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आम्ही आमच्या मुलांचे पालनपोषण मिळून करण्यावर पूर्णपणे लक्ष देत आहोत. आमच्या खासगीत्वाचा सन्मान केला जाईल अशी अपेक्षा करतो असे एवलिनने म्हटले आहे.

Advertisement

विभक्त होण्याचा निर्णय आम्ही शांतपणे आणि परस्पर सहमतीने घेतला आहे. आम्ही आमच्या जीवनाच्या या नव्या टप्प्याला जुनी मैत्री आणि मिळून मुलांचे पालनपोषण करण्यावर पुढे नेत आहोत असे एवलिन यांनी म्हटले आहे.

एवलिन ही 2012-19 पर्यंत बॉलिवूडमध्ये सक्रीय राहिली. यादरम्यान तिने रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोनचा चित्रपट ‘ये जवानी है दीवानी (2013), ‘यारियां’ आणि ‘मैं तेरा हीरो’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

Advertisement
Tags :

.