ईव्ही लोटस कार्स इलेट्रेस भारतीय बाजारात
तीन मॉडेल्समध्ये होणार उपलब्ध : वर्ष 2024 मध्ये पेट्रोल व डिझेल व्हर्जनची कार येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरातील कारच्या विक्रीत घट झाल्यानंतर 2022 मध्ये भारतासारख्या नवीन बाजारपेठांमध्ये विक्री वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. लोटस कार्स इलेक्ट्रिक वाहन इलेट्रेसह भारतीय बाजारपेठेत पोहोचली आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्माता कंपनी लोटस कार्सने इलेक्ट्रिक वाहन इलेट्रेसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीची ही कार तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
चिनी ऑटोमोबाईल कंपनी गीलीच्या मालकीची लोटस कार्स 2024 साली भारतीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेल एमिरा कार
लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनी मार्च 2024 मध्ये दिल्लीत आपले पहिले शोरूम उघडण्यासाठी सज्ज आहे.
भारत सध्या भारत-यूके मुक्त व्यापार करार अंतर्गत ब्रिटिश लक्झरी ईव्हीवरील आयात कर कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. कंपनीचे आफ्टरसेल्स हेड (आशिया पॅसिफिक, वेस्ट आशिया, आफ्रिका आणि भारत) डॉमिनिक बौमगार्ट यांनी सांगितले की, असे झाल्यास कंपनीची भारतीय बाजारपेठेतील विक्री निश्चितच मजबूत होईल.
ते म्हणाले, भारतात अशी कर सूट मिळाल्याने आमच्या यूके प्लांटला खूप फायदा होईल. यामुळे भारतीय बाजारपेठेतील आमच्या प्रवेशाला आणखी वेग येईल. जगभरातील कारच्या विक्रीत घट झाल्यानंतर 2022 मध्ये भारतासारख्या नवीन बाजारपेठांमध्ये विक्री वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. लोटसने गेल्या वर्षी केवळ 567 वाहने विकली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.