10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ईव्ही कार
हॅचबॅकपासन ते मायक्रो एसयूव्हीपर्यंत अनेक कार बाजारात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, पर्यावरणविषयक जागरूकता आणि सरकारी प्रोत्साहनांमुळे लोक आता इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. इतकेच नाही तर कंपन्या आता बजेट फ्रेंडली कारवरही लक्ष केंद्रित करत आहेत. बाजारात 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हॅचबॅकपासून ते मायक्रो एसयूव्हीपर्यंत अनेक कार बाजारात उपलब्ध आहेत. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रीक कार्स पाहुया.
एमजी कॉमेट ईव्ही
मायक्रो-हॅचबॅक कार किंमत जवळपास 6.99 लाख रुपयांपासून सुरू (एक्स-शोरूम) पूर्ण चार्जवर रेंज: 230 किमी वैशिष्ट्यो: एमजी कॉमेट ईव्ही ही भारतातील सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. ही मायक्रो-हॅचबॅक कार शहरांमधील गर्दीचे रस्ते आणि पार्किंग समस्या लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. 17.3 केडब्ल्यूएच बॅटरी पॅकसह, ही कार 110 एनएम टॉर्क देते.
टाटा टियागो ईव्ही
हॅचबॅक कार असून याची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. (एक्स-शोरूम) पूर्ण चार्ज केल्यानंतर रेंज: 315 किमी आहे. वैशिष्ट्यो: टाटा मोटर्सने भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार म्हणून टीयागो ईव्ही लाँच केली आहे. ही कार झिपट्रोन हाय-व्होल्टेज आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि 50 केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे बॅटरी 57 मिनिटांत 10 ते 80 टक्केपर्यंत चार्ज होते.
टाटा पंच ईव्ही
मायक्रो एसयूव्ही या गाडीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. (एक्स-शोरूम)पूर्ण चार्ज केल्यानंतर रेंज: 315 किमी. वैशिष्ट्यो: टाटा पंच ईव्हीचे स्मार्ट मॉडेल 25 किलोवॅट प्रति तास बॅटरीसह येते जी 315 किमी पर्यंतची रेंज देते. त्यात 10.25 इंचाची टचक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 स्पीकर साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग्ज अशी सुरक्षा वैशिष्ट्यो आहेत.