For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युरोपच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीत 37 टक्के वाढ

06:37 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
युरोपच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीत 37 टक्के वाढ
Advertisement

11 अब्ज मूल्याची केली निर्यात : स्मार्टफोनचा वाटा अधिक

Advertisement

नवी दिल्ली :

भारताकडून युरोपला होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्यातीमध्ये जवळपास 37 टक्केची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 11.19 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोनची हिस्सेदारी 60 टक्के इतकी राहिली होती. अभियांत्रिकी साहित्य आणि पेट्रोलियम उत्पादनांचाही निर्यातीत समावेश होता.

Advertisement

अॅपल या कंपनीला अमेरिकेप्रमाणेच युरोपमधून शून्य आयात शुल्काचा लाभ उठवता येत आहे. भारतामध्ये असेंबल करण्यात आलेल्या आयफोनची निर्यात ही नेदरलँडला केली जाते आणि त्यानंतर इतरत्र आयफोनचे वितरण विविध क्षेत्रांमध्ये केले जाते. मात्र अलीकडच्या काळामध्ये यात नाट्यामय बदल दिसून आला. 2025-26 आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत अॅपलकडून साहित्याची पाठवणी अमेरिकेमधून करण्यात आली, त्यामुळे भारतामधून युरोपला होणाऱ्या निर्यातीमध्ये व एकंदर मूल्यामध्ये घसरण दिसून आली. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेमधून आयफोनच्या निर्यातीत आर्थिक वर्ष 2026 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये तीन टक्के वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 12.7 अब्ज  डॉलर मूल्याची होती. आयफोन निर्यातीमध्ये घसरण दिसून आलेली असली तरी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी युरोपमध्ये निर्यात वाढीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण कायम ठेवण्याचे ठरवलेले आहे.

50 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य

इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू म्हणाले की नवा करार हा भारताच्या देशांतर्गत उत्पादनांना निर्यातीच्या बाबतीमध्ये पुढे घेऊन जाणारा ठरणार आहे. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या मते मोबाईल फोन, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर याशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांमध्ये व्यवसाय 2030-31 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची योजना तयार करण्यात आली आहे. तज्ञांचा अंदाज आहे की भारताने आर्थिक वर्ष 2031 पर्यंत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात 500 अब्ज डॉलर्स मूल्याची करण्याचे ठरवले आहे.

Advertisement
Tags :

.