युरोपियन टी-20 प्रीमियर लीग स्पर्धा
वृत्तसंस्था, वूरबर्ग (नेदरलँड्स)
येथे सुरू होणाऱ्या पहिल्या युरोपियन टी-20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघांचे कर्णधार, संघ निश्चित करण्यात आले. सहा संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा पुढील तीन आठवडे खेळविली जणार असून एकूण 32 सामने होणार आहेत. 19 आणि 20 सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने होतील.
सदर स्पर्धा दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाईल. लीग टप्प्यात प्रत्येक गटातील गुणवारीत आघाडीचा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ पात्र फेरीतील संघांबरोबर लढती देतील. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या डब्लीन गार्डन संघाचा राहुल द्रविड हा सहमालक आहे. या संघाचे रविंचंद्रन अश्विन आणि विजय शंकर खेळाडू आहेत. अजिंक्य रहाणेने अलिकडेच या स्पर्धेसाठी अॅमस्टरडॅम फ्लेम्स संघाबरोबर करार केला आहे. अॅमस्टरडॅम संघाचे नेतृत्व कॉटएडवर्ट, रोटरडॅम डॉकेर्स, संघाचे नेतृत्व डुप्लेसीस तसेच बेलफास्ट वेव्जचे नेतृत्व गेन मॅक्सवेल, डब्लीन गार्डीयन्सचे नेतृत्व रविचंद्रन अश्विन तर एडीनबर्ग रॉकर्सचे नेतृत्व मिचेल सॅन्टेनर तसेच ग्लास्गो कॉसमिक्सचे नेतृत्व मुनसेकडे सोपविण्यात आले आहे.