गोव्यात इथरनेट एक्सप्रेसची नेक्स्ट-जनरेशन आयपीटीव्ही सेवा सुरू; एकाच फायबर कनेक्शनवर ब्रॉडबँड, व्हॉईस, ओटीटी आणि लाईव्ह टीव्हीची सुविधा
पणजी : गोव्यातील इंटरनेट सेवा प्रदाता कंपनी इथरनेट एक्सप्रेसने नेक्स्ट-जनरेशन हाय-डेफिनिशन इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (आयपीटीव्ही) सेवा राज्यभर सुरू केली आहे. कंपनीच्या फायबर नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना आता अल्ट्रा-फास्ट ब्रॉडबँड, व्हॉईस सेवा, लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आणि लाईव्ह टीव्ही या सुविधा एकाच फायबर कनेक्शनवर उपलब्ध होणार आहेत.
कंपनीचे सीईओ महेंद्र तिवारी यांनी सांगितले की, या सेवेमुळे गोव्यातील ग्राहकांना ‘ट्रू ट्रिपल प्ले’ डिजिटल इकोसिस्टमचा अनुभव मिळणार आहे. एका कनेक्शनद्वारे विविध डिजिटल सेवा उपलब्ध होत असल्याने घरातील वायरचा पसारा कमी होण्यासोबतच अनेक सेवा पुरवठादारांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्याची गरजही कमी होणार आहे.
हॉटेल्स, रिसॉर्ट्सना फायदा
हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी आपीटीव्ही सेवा अतिथींना उच्च दर्जाचे मनोरंजन आणि सुरळीत स्ट्रीमिंगचा अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. एका फायबर कनेक्शनद्वारे विविध सेवा उपलब्ध होत असल्याने पायाभूत सुविधा, देखभाल आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यास मदत होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एअरबीएनबी होस्ट्ससाठीही ही सेवा किफायतशीर पर्याय ठरणार आहे. प्लग-अँड-प्ले टीव्ही सुविधा आणि निश्चित मासिक बिलामुळे सेवा व्यवस्थापन सुलभ होणार असून, पाहुण्यांना अधिक चांगला मनोरंजनाचा अनुभव देता येणार आहे.
घरगुती ग्राहकांसाठीही सुविधा
घरगुती ग्राहकांना लाईव्ह टीव्ही, व्हॉईस सेवा आणि लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्स एकाच कनेक्शनवर मिळणार आहेत. त्यामुळे विविध सेवांसाठी स्वतंत्र कनेक्शन घेण्याची आवश्यकता कमी होणार असून, घरातील मनोरंजनाचा अनुभव अधिक सुलभ आणि वायर-क्लटरमुक्त होण्यास मदत होणार आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सागर गोवेकर यांनी सांगितले की, गोव्यात विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आयपीटीव्ही सेवेमुळे स्थानिक व्यवसायांना सक्षम करण्यासोबतच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ग्राहकांचे समाधान वाढविणे आणि गोमंतकीय कुटुंबांचा मनोरंजनाचा अनुभव अधिक समृद्ध करणे शक्य होईल.
इथरनेट एक्सप्रेसची आयपीटीव्ही सेवा गोव्यातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. सेवा कव्हरेज आणि विविध व्यावसायिक पॅकेजची माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.