Ethanol Production : इथेनॉलमुळे साखर उद्योगाला अच्छे दिन, कोटींची उलाढाल
कोल्हापूर-सांगलीतील 10 ते 12 कोटी लीटर तर देशभरात 988 कोटी लीटर इथेनॉल निर्मिती दरवर्षी होते
By : संतोष पाटील
कोल्हापूर : ई-20 धोरणाने राज्यासह कोल्हापूर-सांगलीच्या साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. इथेनॉलमुळे साखर कारखान्यांचे उत्पन्न आठ ते 12 टक्के वाढले, कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळाले आणि शिल्लक साखरेचा प्रश्न सुटला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर-सांगलीतील 10 ते 12 कोटी लीटर इथेनॉल उत्पादन आणि महाराष्ट्राचे 130 कोटी लीटर उत्पादन आहे. देशभरात 988 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती दरवर्षी होते.
भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत लागू झालेल्या ई-20 धोरणाने (इथेनॉल 20 टक्के आणि पेट्रोल 80 टक्के) साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होत आहे. महाराष्ट्र आणि देशपातळीवर इथेनॉल उत्पादनाने कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यात हातभार लावला.
2024-25 मधील पेट्रोल बचत आणि परकीय चलन बचत
पेट्रोल बचत : 2022-23 : तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जानेवारी 2024 मध्ये सांगितले की, 2022-23 मध्ये 509 कोटी लिटर पेट्रोलची बचत झाली, ज्यामुळे 24 हजार 300 कोटी रुपये परकीय चलन वाचले. 2024-25 : फेब्रुवारी 2025 पर्यंत इथेनॉल मिश्रण दर 17.98 टक्के होता, जो फेब्रुवारी 2025 मध्ये 19.68 टक्क्यांपर्यंत पोहोचला. 2025-26 पर्यंत 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य साध्य होण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये इथेनॉल उत्पादन 988 कोटी लिटर पर्यंत पोहोचले, जे 2023-24 च्या तुलनेत 41 टक्के जादा आहे. 2022-23 मध्ये 10 ते 12 टक्के मिश्रण दराने 509 कोटी लिटरची बचत झाली. 2024-25 मध्ये 19.68 टक्के मिश्रणाने सुमारे 625 कोटी लिटर म्हणजेच 24 हजार 300 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले. 2024-25 मध्ये अंदाजे 625 कोटी लिटर पेट्रोलची बचत धरल्यास 29 हजार 837 कोटी रुपये परकीय चलन वाचणार आहे.
महाराष्ट्र उत्पादन क्षमता
महाराष्ट्र मोठा इथेनॉल उत्पादक आहे, ज्याची वार्षिक क्षमता 268 कोटी लिटर आहे.
2024-25 मधील उत्पादन : एप्रिल 2025 पर्यंत 130 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन, जे राज्याच्या गरजेच्या (60 ते 65 कोटी लिटर) दुप्पट आहे. इथेनॉल उत्पादनात कोल्हापूर विभागातील 40 कारखाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
बाजारवाढ : भारतीय इथेनॉल बाजार 2027 पर्यंत 40 हजार 593 कोटी रुपये गाठेल, ज्यामुळे साखर उद्योगाला मोठा आधार मिळेल.
दुसरा टप्पा इथेनॉल टू जी : उसाच्या पाचट आणि धान्याच्या भुसा यासारख्या गैर-खाद्य
कोल्हापूर-सांगलीचे योगदान
कोल्हापूर-सांगलीतील साखर कारखान्यांनी 2024-25 मध्ये सुमारे 10 ते 12 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन केले, जे राष्ट्रीय उत्पादनाच्या सरासरी दोन टक्के आहे. सांगली-कोल्हापूरमधील योगदान सुरू असलेल्या 40 साखर कारखान्यांनी 227.68 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले, ज्यापासून 2.5 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली. इथेनॉल निर्मितीमुळे 25 कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळाले, आणि शेतकऱ्यांना प्रतिटन उसासाठी 50 ते 100 रुपये जादा देणे शक्य झाले.
2024-25 मधील उत्पादन - एप्रिल 2025 पर्यंत 988 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले, जे मागील वर्षीच्या तुलनेत 41 टक्के जादा असून 698 कोटी लिटर आहे.
भारत उत्पादन क्षमता - देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता सोळाशे कोटी लिटर आहे, ज्यामध्ये 900 कोटी लिटर ऊस आधारित आणि 700 कोटी लिटर धान्य आधारित (मका, तांदूळ) आहे.
ई-20 धोरण - 2025-26 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी दरवर्षी एक हजार 16 कोटी लिटर इथेनॉल आवश्यक आहे, ज्यापैकी 54 टक्के ऊस आधारित आणि 46 टक्के धान्य आधारित असेल.
आर्थिक योगदान :
इथेनॉलमुळे 30 हजार कोटी रुपये परकीय चलनाची बचत. 2024-25 हंगाम : महाराष्ट्रात 843.33 लाख टन उसाचे गाळप झाले, ज्यापासून 79.74 लाख टन साखर आणि इथेनॉल निर्मिती झाली. आव्हाने-भविष्यातील शक्यता ई-100 ची दिशा : भविष्यात 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने (ई-100) हा पर्याय असेल, ज्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व संपेल.