For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ संस्थेची बेळगावात स्थापना

10:37 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ संस्थेची बेळगावात स्थापना
Advertisement

संस्थेतर्फे 10-11 रोजी ‘सं.सौभद्र’ व ‘सं.संशयकल्लोळ’ नाट्याप्रयोग

Advertisement

बेळगाव : नाट्या व संगीत क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्यातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, या हेतूने बेळगावमध्ये ‘वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेची स्थापना झाली आहे. आपला पहिलाच उपक्रम म्हणून या संस्थेतर्फे दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे ‘संगीत सौभद्र’ व ‘संगीत संशयकल्लोळ’ या दोन नाट्याप्रयोगांचे कन्नड भवन, नेहरूनगर येथे आयोजन केले आहे. गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि शिलेदार कुटुंबीयांनी संगीत रंगभूमीला जीवदान मिळावे, यासाठी बरेच प्रयत्न केले. याच हेतूने 1993 मध्ये बेळगावातच जन्म झालेले जयराम शिलेदार यांनी मराठी संगीत नाटकांमध्ये अनेक भूमिका केल्या. त्यांच्याच नावाने संगीत नाट्या सेवा ट्रस्टची स्थापना झाली आहे. या ट्रस्टअंतर्गत संगीत नाटक आणि नाट्यासंगीताला पुन्हा उजाळा देणे, संगीत नाटक, वेशभूषा, नेपथ्य, रंगभूषा याबाबत कार्यशाळा घेणे, नवोदित कलाकारांना मराठी संगीत नाटकांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करणे व जुन्या मराठी संगीत नाटकांचे डिजिटलायझेशन करणे हे ट्रस्टचे हेतू आहेत. ट्रस्टच्या संचालक कीर्ती शिलेदार यांनी आजवर महाराष्ट्र आणि भारतभर अनेक नाट्याप्रयोग सादर केले आहेत. याच संस्थेची मराठी रंगभूमी ही संस्था जयराम शिलेदार व पद्मश्री जयमाला शिलेदार यांनी 1949 मध्ये स्थापन केली. ऑक्टोबर 2023 मध्ये या संस्थेने 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. याच अमृतमहोत्सवी वर्षाचा उपक्रम म्हणून हे दोन नाट्याप्रयोग बेळगावला होत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.