For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंट फ्रान्सिस अवशेष सोहळ्यासाठी खास ‘प्रदर्शन सचिवालय’ची स्थापना

10:20 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेंट फ्रान्सिस अवशेष सोहळ्यासाठी खास ‘प्रदर्शन सचिवालय’ची स्थापना
Advertisement

पणजी : जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या 21 नोव्हेंबरपासून होणाऱ्या दर्शनाशी संबंधित दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने ‘प्रदर्शन सचिवालय’ स्थापन केले आहे. 5 जानेवारी 2025 पर्यंत हा दर्शन सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, महसूल सचिव संदीप जॅकीस, साबांखा मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस, पोलिस अधीक्षक एडविन कुलासो, एसपी (सुरक्षा) किरण पौडवाल, साबांखा मुख्य वास्तुविशारद मार्विन गोम्स, संदिप प्रभू चोडणेकर, वाहतूक उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर, आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय 40 सदस्यीय उच्चाधिकार समन्वय समितीही स्थापन करणत आली असून त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासह अन्य आमदार तसेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.