For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एस्सार ग्रुप अमेरिकेत 1.5 लाख कोटींची गुंतवणूक करणार

06:37 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
एस्सार ग्रुप अमेरिकेत 1 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार
Advertisement

आयोवामध्ये सर्वात मोठा पोलाद कारखाना उभारणार : 2030 पासून सुरुवात

Advertisement

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

भारताचा एस्सार ग्रुप अमेरिकेत 18 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा भाग अमेरिकेतील आयोवा राज्यात 15 अब्ज डॉलर्स खर्च करून उभारण्यात येणाऱ्या पोलाद कारखान्यावर खर्च केला जाईल. हा अमेरिकेतील सर्वात मोठा पोलाद कारखाना असणार आहे.

Advertisement

व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, ट्रम्प यांना एस्सार ग्रुपचे सह-संस्थापक रवी रुईया आणि त्यांचे पुत्र रेवंत रुईया यांच्या उपस्थितीत या मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली.

आयोवामध्ये 1,750 नोकऱ्यांची निर्मिती

हा स्टील प्लांट एस्सार ग्रुपची अमेरिकन कंपनी असलेल्या मेसाबी मेटल्सद्वारे बांधणी करण्यात येणार आहे. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याच्या मते, 2030 पर्यंत या प्लांटमध्ये स्टीलचे उत्पादन सुरू करण्याचे ध्येय आहे. पूर्ण झाल्यावर, हा प्लांट दरवर्षी 1 कोटी टन स्टीलचे उत्पादन करेल. या प्रकल्पाद्वारे आयोवा राज्यात सुमारे 1,750 कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.

पहिली नवीन लोहखनिजाची खाण

व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेत 50 वर्षांत उघडणारी ही पहिली नवीन लोहखनिजाची खाण आहे. एस्सार ग्रुपने स्टील प्लांटच्या कामकाजासाठी कच्चा माल म्हणजेच लोहखनिज (पिग आयर्न) पुरवण्यासाठी मिनेसोटामध्ये एक नवीन खाण उभारली आहे. कंपनीने या खाणीच्या बांधकामावर 2.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 21 हजार कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. ट्रम्प म्हणाले की, आता प्रत्येकजण अमेरिकेत स्वत:चे प्लांट उभारत आहे कारण कोणालाही 50 टक्के जकात भरायची नाही. ही गोष्ट खूप सोपी आणि सरळ आहे.

एस्सार ग्रुपची सुरुवात भारतात 1969 मध्ये शशी रुईया आणि रवी रुईया या भावांनी केली. आज हा ग्रुप ऊर्जा, खाणकाम, तंत्रज्ञान आणि रिटेल यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. भारतातील मालमत्ता: या ग्रुपचा देशातील सर्वात मोठा स्टील प्लांट गुजरातच्या हाजिरा येथे आहे. त्याचबरोबर, भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी वडीनारमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय: यूकेमध्ये, समूहाने शेलची प्रसिद्ध स्टेनलो रिफायनरी अधिग्रहित केली आहे. याशिवाय, सौदी अरेबियामध्ये कमी-कार्बन स्टील प्लांट उभारण्याची योजना आहे.

Advertisement
Tags :

.