‘ईएसआयसी’ने 23 लाख नवे सदस्य जोडले
ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणी झाल्याची कामगार मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली :
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने मे 2024 मध्ये आपल्या ईएसआय योजनेअंतर्गत 23.05 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केल्याचे कामगार मंत्रालयाने बुधवारी सांगितले. मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, मे 2024 पर्यंत 20,110 नवीन आस्थापना ईएसआय योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नोंदणीत 14 टक्क्यांची वाढ
या व्यतिरिक्त, निवेदनात असेही म्हटले आहे की, मे 2023 मधील 20.23 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत निव्वळ नोंदणीमध्ये मे 2024 मध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात जोडलेल्या एकूण 23.05 लाख सदस्यांपैकी 11.15 लाख कर्मचारी, जे एकूण 48.37 टक्के आहेत.
25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील नोंदणी
नोंदणीत 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत. तसेच, मे 2024 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 4.47 लाख होती. या महिन्यात एकूण 60 ट्रान्सजेंडर सदस्यांची ईएसआय योजनेंतर्गत नोंदणी करण्यात आली.