प्रताप’ चित्रपटात ईशा देओल
चित्रपट ‘प्रताप’चा टीझर निर्मात्यांनी जारी केला आहे. चित्रपटात अभिनेता अमित साध मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये एक पोलीस अधिकारी आणि त्याच्यामागे रचण्यात आलेला कट दाखविण्यात आला आहे. प्रताप चित्रपटाच्या कहाणीत एका पोलीस अधिकाऱ्याची कहाणी दर्शविण्यात आली आहे. हा पोलीस अधिकारी एका स्फोट प्रकरणात अडकला आहे. या प्रकरणामुळे त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात आलेले असते. परंतु तो हार मानत नाही. तुरुंगात असतानाही तो स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी कायद्याची मदत घेतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन सराफ यांनी केले असून त्यांनीच याची कहाणी लिहिली आहे. तर चित्रपटाची निर्मिती प्रदीप रंगवानी आणि यूव्ही फिल्म्सकडून करण्यात आली आहे. यापूर्वी सचिनने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी, बादशाहो, वीर आणि अपने या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तर प्रताप चित्रपटात अमित साध याच्यासोबत ईशा देओल, तिग्मांशु धुलिया, मिलिंद गुणाजी आणि सीमा विश्वास यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
