मालामाल वीकली 2’मध्ये ईशा देओल
ईशा देओल पुन्हा एकदा विनोदीपटात भूमिका साकारणार आहे. ईशा पुढील काळात ‘मालामाल वीकली 2’ या अत्यंत मजेशीरअन् मनोरंजनाने भरपूर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईशाने अलिकडेच ‘घूंघट’ आणि तेलगू चित्रपट ‘एसवायजी’ पूर्ण केले आहेत. ईशाने यापूर्वी ‘नो एंट्री’, ‘शादी नं. 1’ आणि ‘वन टू थ्री’ यासारख्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोदी कहाणी नेहमीच माझ्या मनाच्या जवळ राहिली आहे. चित्रपटाची कथाच मालामाल वीकली 2 प्रोजेक्टचा हिस्सा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरल्याचे ईशाने म्हटले आहे. मालामाल वीकली 2 ची पटकथा अत्यंत मजेशीर असून प्रत्येकाला ती पसंत पडेल असे मला खरोखरच वाटते. पूर्णपणे मस्ती, हास्य अन् मनोरंजनाने भरपूर अशा चित्रपटाचा हिस्सा असल्याने मी अत्यंत आनंदी असल्याचे ईशाने म्हटले आहे. मालामाल वीकली 2 चित्रपटात रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव, एल्विश यादव, रविना टंडन, परिणीति चोप्रा, शिल्पा शिरोडकर, फरदीन खान हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी करणार आहे. तर याचे चित्रिकरण नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.