For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामावर परतली ईशा देओल

06:27 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
कामावर परतली ईशा देओल
Advertisement

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनातून केवळ चाहते आणि देओल परिवारच नव्हे तर पूर्ण चित्रपटसृष्टी सावरलेली नाही. अलिकडेच धर्मेंद्र यांचा पुत्र सनी देओल आगामी चित्रपट बॉर्डर 2 च्या टीझर लाँचकरता पोहोचला होता, परंतु तेथे त्याचे डोळे पाणावलेले दिसून आले. आता सनीनंतर ईशा देओलनही स्वत:चे काम सुरू केले आहे.  ईशाने स्वत:च्या फोटोशूटची छायाचित्रे शेअर केली. हा फोटोशूट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, मी त्याच्या कव्हरसाठी शूट केले होते. या सीझनसाठी मी काही बदल देखील शेअर करणार आहे, असे तिने म्हटले आहे.  या पोस्टसोबत ईशाने एक मुलगी किंवा माणूस म्हणून मला चुकीचे समजू नका, मी केवळ  कमिटमेंट्स पूर्ण करतेय, ज्याबद्दल मी खूप पूर्वीच शब्द दिला होता असे नमूद केले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर फोटोशूटवरून वाद होऊ नये म्हणून ईशाने ही पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.