कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

34 वर्षांनी तुरुंगात परतला फरार कैदी

06:09 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केरळच्या कन्नूर जिल्ह्यात विचित्र प्रकार घडला आहे. ही कहाणी भास्करन नावाच्या कैद्याची आहे. हा कैदी 34 वर्षांपूर्वी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर पडला होता, जो त्यानंतर परतला नव्हता. परंतु अचानकपणे भास्करन पुन्हा तुरुंगात परतला आहे. भास्करन हा कन्नूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. 1980 च्या दशकात हत्येप्रकरणी भास्करनला जन्मठेप सुनावण्यात आली होती. तो तुरुंगात शिक्षाही भोगत होता. परंतु 1989 मध्ये भास्करनला काही दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलचा कालावधी संपल्यावरही तुरुंगात न परतल्याने भास्करनला फरार घोषित करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement

उर्वरित शिक्षेसाठी परतला

तुरुंगात न परतल्याने तुरुंग प्रशासन आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता, परंतु तो कुठेच आढळून आला नव्हता. काळ उलटत गेला आणि तो कदाचित मृत्युमुखी पडला असावा असे मानले गेले. प्रशासनाने त्याची फाइलही बंद केली होती. परंतु 34 वर्षांनी भास्करन अचानक तुरुंगात परतला आणि आता आपण उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तयार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्या या कृत्यामुळे तुरुंग प्रशासन आणि पोलीसही अचंबित झाले आहेत.

इतक्या वर्षांपर्यंत होता कुठे?

भास्करनने या 34 वर्षांविषयी खुलासा केला आहे. या वर्षांदरम्यान मी वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिलो. कधीच मोठ्या शहरात गेलो नाही आणि नेहमीच छोट्या ठिकाणी काम करत राहिलो. मी माझी ओळख बदलली होती आणि निनावी जगत होतो. मी कुणाशी फारसे बोलत नव्हतो आणि स्वत:ला इतरांच्या नजरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचो. परंतु कायद्यापासून वाचणे शक्य नसल्याची उपरती झाल्याचे त्याचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article