For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सैन्याधिकाऱ्याच्या भूमिकेत एरिका फर्नांडिस

06:27 AM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
सैन्याधिकाऱ्याच्या भूमिकेत एरिका फर्नांडिस
Advertisement

सुमारे 5 वर्षांनी अभिनेत्री एरिका फर्नांडिस टीव्ही शो  ‘108 बेस हॉस्पिटल उरी’मध्ये डॉ. मेजर नैना सान्यालच्या भूमिकेत दिसून येत आहे. काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांच्या पार्श्वभूमीतील सेट असणारा हा शो युद्धभूमीपासून हटत सैन्य रुग्णालयावर प्रकाश टाकतो, जेथे डॉक्टर आणि वैद्यकीय पथक संघर्षाच्या क्षेत्रातून आणले गेलेल्या सैनिकांवर उपचार करतात आणि असाधारण दबावात काम करतात. मला यापूर्वी ज्या ऑफर मिळत होत्या, त्यातील बहुतांश सासूसुनांच्या ड्रामांचे होत्या आणि त्या मला करायच्या नव्हत्या. अशास्थितीत हा प्रोजेक्ट माझ्याकडे आल्यावर मी तो स्वीकारला.

Advertisement

यात काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळेल असा माझा विचार होता. या शोचे चित्रिकरण काश्मीर समवेत अनेक खऱ्या लोकेशन्सवर झाले असल्याचे एरिकाने म्हटले आहे.  वैद्यकीय क्षेत्र देखील या शोची निवड करण्यामागे एक मोठे कारण होते. मला वैद्यकीय क्षेत्राबद्दल नेहमीच उत्सुकता राहिली आहे आणि या भूमिकेसाठी मोठी तयारी देखील केली आहे. या शोमध्ये अत्यंत वेगवेगळी प्रकरणे दाखविण्यात आली आहेत. सैन्याच्या डॉक्टरचा अनुभव काहीसा वेगळा असतो असे उद्गार एरिकाने काढले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.