For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवानगरमध्ये पंपहाऊसमधून 53 हजाराच्या साहित्याची चोरी

03:25 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
नवानगरमध्ये पंपहाऊसमधून  53 हजाराच्या साहित्याची चोरी
Advertisement

दापोली : 

Advertisement

तालुक्यातील नवानगर-तांबडीकोंड येथील पंपहाऊसमधून पंप व इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची फिर्याद ततीक्षा सुदर्शन गायकवाड यांनी दापोली पोलिसात दिली आहे.

पोलीसांकडून मिळलेल्या माहितीनुसार 4 एप्रिल सायंकाळी 6 ते 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या कालावधीत नवानगर-तांबडीकोंड येथील चोरट्याने फिर्यादीच्या मालकीच्या पंप हाऊसमध्ये ठेवलेले साहित्य दरवाजाची कडी वाकवून दरवाजा तोडून चोरुन नेले आहे. यामध्ये 48 हजार रुपयांचे कंपाउंड करण्यासाठी वापरण्यात येणारी तारेची 8 बंडल, 2 हजार रुपयांच्या पाण्याचा बोरींगचा स्टार्टर, 2400 रुपयांचे दोन पाण्याचे पाईप, दोन लोखंडी पहार, 1 हजार रुपयांच्या ए सीसी सिमेंटच्या 3 बॅगा, असे एकूण 53,600 ऊपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.