For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ईपीएफओ’ची ऑनलाईन सेवा आजपासून पुन्हा होणार सुरु

06:17 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ईपीएफओ’ची ऑनलाईन सेवा आजपासून पुन्हा होणार सुरु
Advertisement

पाच दिवसांच्या सिस्टम अपग्रेड  आणि डेटाबेस मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण

Advertisement

वृत्तसंस्था,  नवी दिल्ली

ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ऑनलाइन सेवा वापरत असणाऱ्या आता  एक आनंदाची बातमी आहे. कारण 5 दिवसांच्या सिस्टम अपग्रेड आणि डेटाबेस मायग्रेशन प्रक्रियेनंतर, ईपीएफओच्या सर्व ऑनलाइन सेवा 1 जुलै 2026 पासून (आजपासून) पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. यानंतर कर्मचारी आणि नियोत्ते पहिल्यांदाच पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक सेवांचा लाभ घेऊ शकणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

ईपीएफओधारकांसाठी ऑनलाइन सेवा

ईपीएफओने आपली दावा प्रक्रिया प्रणाली पूर्वीपेक्षा अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर अपग्रेड आणि डेटाबेस एकत्रीकरण सुरू केले होते. यामुळे, सदस्य पोर्टल आणि नियोक्ता पोर्टलच्या सर्व ऑनलाइन सेवा 26 जून ते 30 जून 2026 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला, ईपीएफओच्या ऑनलाइन सेवा 29 जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते, परंतु तांत्रिक प्रक्रियेला अतिरिक्त वेळ लागल्याने ही मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली होती.

प्रणाली अपग्रेड दरम्यान ईपीएफओच्या सदस्यांसाठी अनेक ऑनलाइन सुविधा उपलब्ध नव्हत्या, या सेवांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे

- पीएफ पासबुक पाहणे

-ऑनलाइन दावा सादर करणे

-दाव्याची स्थिती तपासणे

-वैयक्तिक माहिती अद्ययावत करणे

-पीएफ हस्तांतरणासाठी विनंती करणे

-सदस्य पोर्टल किंवा इतर डिजिटल सेवांचा वापर करणे

-या सेवांसोबतच, नियोत्ते देखील पोर्टलवर लॉग इन करून नियमित प्रशासकीय आणि अनुपालन संबंधित कामे करू शकत नव्हते.

मात्र आता ईपीएफओ प्रणाली अद्ययावतीकरणानंतर काय बदल होईल?

-ईपीएफओच्या मते, या तांत्रिक अद्ययावतीकरणाचा उद्देश

-ऑनलाइन सेवापूर्वीपेक्षा अधिक चांगल्या बनवण्याचे ध्येय आहे.

-नवीन प्रणालीद्वारे मिळणार आता सुविधा

-दाव्यांचा निपटारा अधिक जलद होईल.

-प्रणालीची सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल.

-डेटाबेस अधिक संघटित केला जाईल.

-वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि सोपा डिजिटल अनुभव मिळेल.

-ऑनलाइन सेवांची विश्वसनीयता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

Advertisement
Tags :

.