महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ईपीएफओ’ कर्मचाऱ्यांना एटीएमद्वारे पैसे काढता येणार

06:42 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅन 2.0 च्या धर्तीवर ईपीएफओ 3.0 आणण्याची केंद्राची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने मागील काही दिवसांमध्ये पॅन 2.0 या प्रकल्पाची घोषणा केली होती. यांच्या मदतीने प्राप्तिकरधारकांना क्यूआर कोडसोबत पॅनकार्ड देण्यात येणार आहे. आता सरकारने ईपीएफओ नियमांमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकार पॅन 2.0 च्या अंतर्गत ईपीएफओ 3.0 आणण्याची तयारी करत आहे.

या नव्या नियमानुसार कर्मचारी भविष्य निधी संघटनांशी संबंधीत सदस्यांची अनेक समस्यांपासून सुटका होणार आहे. यासोबतच अनेक नवनवीन सुविधांही सुरु होणार आहेत. ज्यामध्ये देशातील लाखो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

12 टक्के पीएफचे योगदान होणार समाप्त

विविध मीडिया अहवालानुसार दावा करण्यात येत आहे, की एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट फंड ऑर्गनायझेशनच्या ईपीएफओ 3.0 प्रोजेक्टच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या 12 टक्के पीएफमधील योगदान मर्यादा समाप्त करण्यात येणार आहे. कर्मचारी आपल्या बचतनुसार योगदान देऊ शकतात. याच्या आधारे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिकची बचत करण्यास सक्षम होण्याची संधी निर्माण होणार आहे. सध्या मात्र कर्मचाऱ्यांचा हप्ता हा कर्मचाऱ्याच्या वेतनावर आधारीत निर्धारित करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नसल्याची माहिती आहे.

एटीएमच्या मदतीने काढता येणार पैसे

ईपीएफओ सदस्य आवश्यकता पडल्यानंतर पीएफ खात्यामधून एटीएमच्या मदतीने फंड काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मीडिया अहवालानूसार करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये कामगार मंत्रालयाची मदत घेत एटीएम सादर करण्यावर काम सुरु करण्यात आले आहे. ईपीएफओ सदस्यांसाठी ही सुविधा मे ते जून 2025 पर्यंत सुरु करण्याचे ध्येय सरकारने निश्चित केले आहे. यामुळे ईपीएफओ ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएफमध्ये जमा असलेल्यापैकी 50 टक्केच रक्कम काढण्यात येणार आहे.

Advertisement
Next Article