For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईपीएफओने जोडले 14.41 लाख सदस्य

06:08 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईपीएफओने जोडले 14 41 लाख सदस्य
Advertisement

मार्च महिन्यातील आकडेवारी : 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा समावेश 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिटायरमेंट फंड मॅनेजमेंट बॉडी ईपीएफओने नवीन डेटा सादर केला आणि सांगितले की या वर्षी मार्चमध्ये 14.41 लाख नवीन सदस्य जोडले गेले. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की वेतनश्रेणी डेटा दर्शविते की सुमारे 11.80 लाख सदस्यांनी ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) सोडले आणि नंतर पुन्हा सामील झाले.

Advertisement

निवेदनानुसार, या सदस्यांनी आपली नोकरी बदलली आणि ईपीएफओच्या अखत्यारीतील आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले. अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यानी आपला निधी हस्तांतरित करणे निवडले. मंत्रालयाने सांगितले की, सादर केलेल्या ईपीएफओच्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मार्च 2024 मध्ये संस्थेने 14.41 लाख निव्वळ सदस्य जोडले.

आकडेवारीनुसार, मार्च, 2024 मध्ये सुमारे 7.47 लाख नवीन सदस्य सामील झाले. मार्च, 2024 मध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी 18-25 वयोगटाचा वाटा 56.83 टक्के होता. आकडेवारीनुसार, 7.47 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे दोन लाख महिला सदस्य आहेत.

Advertisement
Tags :

.