For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यावरणपुरक माल हाताळणी व्हावी

12:47 PM May 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
पर्यावरणपुरक माल हाताळणी व्हावी
Advertisement

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन : मुरगांव बंदरात तीन प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

Advertisement

वास्को : मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीसाठी डोम, एमपीएचा सौर उर्जा प्रकल्प तसेच बंदरातील दोन अत्याधुनिक क्रेन अशा तीन प्रकल्पांचे उपराष्ट्रपती जगदीप  धनखड यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले. एमपीएच्या हेडलॅण्ड सड्यावरील प्रशासकीय इमारतीच्या आवारात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हरित उर्जा व पर्यावरणपुरक माल हाताळणी ही काळाची गरज आहे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. या समारोहाच्या  व्यासपीठावर सौ. धनखड यांच्यासह गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय बंदर व जहाजोद्योग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार, बंदर व जहाजोद्योग खात्याचे सचिव पी. के. रामचंद्रन उपस्थित होते. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्यासह एमपीएचे तसेच भारतीय तटरक्षक दलाचे वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते. स्थानिक पारंपरिक घोडेमोडणी नृत्य सादर करून उपराष्ट्रपतींचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी उपराष्ट्रपतींना मानवंदना दिली. उपराष्ट्रपती धनखड व डॉ. सौ. सुदेश धनखड यांच्या हस्ते यावेळी रोपटी लावण्यात आली.

मुरगाव बंदर ठरले पहिले

Advertisement

मुरगाव बंदरातील जेएसडब्ल्यू कंपनीने आपल्या कोळसा हाताळणीसाठी जवळपास दीडशे कोटी खर्चून बंदरात ‘डोम’ उभारला आहे. कोळसा प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. बंदरातील खासगी कंपनीने माल हाताळणीसाठी दोन अत्याधुनिक क्रेन उभारल्या आहेत. त्यामुळे माल हाताळणीची गती वाढणार आहे. शिवाय एमपीएने हेडलॅण्ड सड्यावर तीन मेगा वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे. या सौर उर्जा प्रकल्पाचा मुरगाव बंदराला मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून असा प्रकल्प उभारणारे मुरगाव बंदर प्राधिकरण हे भारतातील पहिले ठरले आहे. हे तिन्ही प्रकल्प उपराष्ट्रपतींनी आभासी पध्दतीने कार्यान्वीत केले.

दुर्लक्षित उर्जेचा आज चांगला वापर

लोकार्पणानंतर बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी देशाचा विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन असल्याचे सांगून हाती घेतलेला विकास जलद पूर्ण व्हावा हेही त्यांचे ध्येय असते असे स्पष्ट केले. मुरगाव बंदरातील अत्याधुनिक प्रकल्पांच्या उभारणीबंद्दल त्यांनी एमपीए व जेएसब्ल्यू या कंपन्यांचे  अभिनंदन केले. एकेकाळी सौर उर्जा स्त्राsत दुर्लक्षित होता. आज भारतात सगळीकडे सौर उर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. त्यातून आपल्याला हरित आणि स्वच्छ उर्जा प्राप्त होत असते. पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त सौर उर्जा प्रकल्प देशाच्या विकासाचा दर्जा दशर्वत आहेत असे उपराष्ट्रपती म्हणाले. बंदरात डोम उभारण्यात आल्याने पर्यावरणस्नेही वातावरणात माल वाहतुकीला बळ मिळणार आहे. जेएसडब्ल्यूचा हा अभिनंदनीय प्रकल्प आहे. हे उल्लेखनीय तंत्रज्ञान आहे. असा विकास काळाची गरज आहे असे उपराष्ट्रपती  म्हणाले.

गोव्याचा विकास अभिमानास्पद 

मुरगाव बंदर देशातील एक जुने बंदर आहे. या बंदराने गोव्याच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. गोवा जागतिक पर्यटकांचेही आकर्षण असून गोव्याने केलेला विकास गर्व करण्यासारखा आहे असे उपराष्ट्रपती धनखड यांनी नमूद केले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्त्युतर या विषयांवरही उपराष्ट्रपती बोलले.

भारतीयांना तटरक्षक दलाबद्दल प्रेम

उपराष्ट्रपतीनी या समारोहात भारतीय तटरक्षक दलाशीही संवाद साधला. तटरक्षक दलाच्या शौर्याबद्दल त्यांनी गर्व व्यक्त केला. ते म्हणाले की, देशातील जनतेचा तटरक्षक  दलावर विश्वास आहे. ते तटरक्षक दलाकडे प्रेमाने पाहतात. निळ्या आर्थिक विकासाच्या वृध्दीसाठी तटरक्षक दलाचे योगदान मोठे आहे असे ते म्हणाले.

देशात साधनसुविधांचा विकास : शंतनू

केंद्रीय बंदर व जहाजोद्योग राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले की, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुरगाव बंदरातील विकास प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे, हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात साधनसुविधांचा विकास होत आहे. बंदरांचा विकास होत आहे. आर्थिक विकास साधला जात आहे. गोव्यातही उल्लेखनी विकास होत असून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होत आहे असे ते म्हणाले.

मुरगाव पहिले हरित बंदर ठरणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना मुरगाव बंदरात हरित उर्जा स्त्राsत निर्माण केल्याबद्दल मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अभिनंदन केले. जेएसडब्लू कंपनीने उभारलेला ‘डोम’ कोळसा प्रदूषण रोखण्यास लाभदायी ठरेल. मुरगाव बंदराला महामार्गाने जोडण्यात आल्याने मालवाहतुकीची स्वतंत्र सोय झालेली आहे. त्यामुळे वाहतुकीतील अडचणी दूर झालेल्या आहेत. त्याबद्दल समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी बंदराचे खासगीकरण होत असताना स्थानिक व्यवसायीकांच्या हिताचाही विचार करण्यात यावा, त्यांच्या समस्यांचीही दखल घेण्यात यावी असे सुचित केले.

Advertisement
Tags :

.