महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत २२ सप्टेंबरला होणार पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा

04:44 PM Sep 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

'ॲन्ट्रीको'चं आयोजन, सावंतवाडी पत्रकार संघ असेल मिडिया पार्टनर

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'ॲन्ट्रीको' या संस्थेकडून ''पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा'' या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. निसर्गातील टाकाऊ घटकांपासून बनवलेली कलाकृती हा या स्पर्धेचा विषय आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धा आहे. यातील कलाकृतींचं प्रदर्शन सार्वजनिक गणेश मंडळ हॉल, सालईवाडा येथे २२ सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे मिडिया पार्टनर सावंतवाडी तालुका पत्रकार संघ असणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

'ॲन्ट्रीको' या संस्थेकडून ''पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा'' आयोजित करण्यात आली आहे. प्रथम तिन क्रमांकाना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत. कलाकृतीचा आकार 1 फूट ते 2 फूट असावा, कलाकृती टाकाऊ पदार्थांपासून बनवल्या पाहिजेत. वयाची मर्यादा नसून निसर्गातील टाकाऊ घटकांपासून बनवलेली कलाकृती आवश्यक आहे. तसेच निसर्गाची हानी न करता घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. उदा. सरपण (जळाऊ लाकूड), वाळलेली पाने, टाकाऊ बांबू, टाकाऊ लाकूड, टाकाऊ बियाणे, झावळ्या आदी वस्तूंचा उपयोग करून कलाकृती करायची आहे‌. मूळ आणि काल्पनिक, सर्जनशील असणे आवश्यक आहे. पर्यावरण संदेश किंवा निसर्गाचे चित्रण करणारी कला असावी, वैयक्तिकरित्या किंवा संघात काम करू येऊ शकते.दिनांक १८/०९/२०२४ ते २२/०९/२०२४ दरम्यान, आलासा स्टुडिओ (दुकान), पेट्रोल पंपाजवळ, सालईवाडा, सावंतवाडी येथे आपल्या कलाकृती जमा करायच्या आहेत. अधिक माहितीसाठी 917875875754, 919022652519 यावर संपर्क साधावा. दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक गणेश मंडळ हॉल, सालईवाडा येथे या कलाकृतींचे प्रदर्शन सायंकाळी ठीक ४ वा. भरणार आहे. तरी या पर्यावरण पुरक स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं असं आवाहन ॲन्ट्रीको व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat sindhudurg # news update # sawantwadi
Next Article