त्रिपुरामार्गे देशात रोहिंग्यांचा शिरकाव : साहा
रोहिंग्या घुसखोरांना कुठल्याही स्थितीत रोखा
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुराच्या मार्गे रोहिंग्या मुस्लिमांच्या देशातील घुसखोरीला रोखण्यासाठी मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पोलिसांना कठोर पाऊल उचलण्याचा आदेश दिला आहे. रोहिंग्या घुसखोर त्रिपुराद्वारे अन्य राज्यांमध्ये पोहोचत असून हा प्रकार रोखणे अत्यंत आवश्यक आहे. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून झालेल्या समीक्षा बैठकीत मुख्यमंत्री साहा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कुठल्याही स्थितीत घुसखोरी रोखण्याचा निर्देश दिला आहे.
राज्याला माफियामुक्त करणे आणि त्यासाठी कुठली पावले उचलली जावीत यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली आहे. गुन्ह्dयांच्या विरोधात झिरो टॉलरन्स धोरणासह राज्याच्या पोलीस स्थानकांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज केले जाणार असल्याचे साहा म्हणाले
रोहिंग्या मुस्लीम त्रिपुराचा कॉरिडॉर प्रमाणे वापर करत आहेत. त्रिपुरात शिरून मग देशाच्या उर्वरित हिस्स्यांमध्ये ते फैलावत आहेत. उनाकोटी जिल्ह्यात बांगलादेशच्या सीमेवर तारांचे कुंपण पूरामुळे नष्ट झाले. याचा गैरफायदा घेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पशू तस्करीही होत असल्याचे साहा यांनी म्हटले आहे.
सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांदरम्यान समन्य वाढवून या कारवाया रोखण्याची गरज आहे. याचबरोबर अमली पदार्थाच्या माफियांना रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा अशी सूचना मुख्यमंत्री साहा यांनी केली आहे.