कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश
कुडाळ / वार्ताहर
आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे- गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी नाईक यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.आमदार नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते कुंदे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.
आमदार नाईक म्हणाले, आपल्यावर व आपल्या पक्षावर जो विश्वास या कार्यकर्त्यांनी दाखविला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करीत कुंदे गावचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी प्रवेशकर्ते व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते याना दिला.यावेळी अनंत गावडे,अनिल खंदारे अशोक गावडे,अक्षय गावडे,विनायक गावडे,कृष्णा कासले भाजप या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला याप्रसंगी उपतालुका प्रमुख सचिन कदम,उपविभागप्रमुख राजेंद्र घाडीगावकर, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे आदी उपस्थित होते.