उबाठाचे दिलीप निचम आणि नीलेश खानोलकर शिंदे शिवसेनेत
कुडाळ -
मांडकुली येथील माजी उपसरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( उबाठा) पक्षाचे उपविभाग प्रमुख दिलीप निचम व उबाठाचे शाखाप्रमुख नीलेश खानोलकर यांच्यासह उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत मांडकुली येथे शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यामुळे या गावामध्ये शिंदे शिवसेनेने उबाठा शिवसेनेला धक्का दिला.गेली अनेक वर्षे या गावातील ग्रामस्थ उबाठा शिवसेनेसोबत होते.या गावाचा विकास थांबला होता. गावाचा विकास व्हावा. या हेतूने उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचे निश्चित केले आणि हा प्रवेश करण्यात आला,अशी माहिती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
माजी सभापती ॲड. विवेक मांडकुलकर, मोहन सावंत, पंचायत समिती माजी सदस्य मिलिंद नाईक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चाचे कुडाळ अध्यक्ष रुपेश कानडे, श्री. वारंग आदी उपस्थित होते. माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख नीलेश खानोलकर यांच्यासह पूजा चव्हाण, अजित निचम, दिनेश निचम, गणपत निचम, चैतन्य मुळीक, दीपक मराठे, दाजी गावकर, गुरुनाथ लाड, नितीन कैटकर, शुभम चव्हाण, बंड्या मराठे, नाना मुळीक, आर्यन लाडले समीर लाडले, संतोष सावंत, आनंद सामंत, कृष्णा खवणेकर,मुकुंद खवणेकर, मुरलीधर खवणेकर, उल्हास मांडकुलकर, दीपक खरूडे, गोविंद अणसुरकर, मंगेश अणसुरकर, गणेश गावकर ,संजय तेंडोलकर, सिद्धेश मांडकुलकर, सदिच्छा मराठे, सुवर्णा मराठे, राघो गावकर ,अजय गावकर ,तुकाराम गावकर, अजय खवणेकर, पप्पू सावंत, आनंद काळसेकर ,बाळा तेंडोलकर, जगन्नाथ पेडणेकर, वैभव खवणेकर, सिद्धी मांडकुलकर, अनिता मांडकुलकर ,वैशाली निचम, शुभांगी निचम, दिया निचम,कविता मुळीक ,सुनिता खानोलकर, मनाली मराठे आदी कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. नीलेश राणे म्हणाले, यापुढे तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होणार नाही गावाच्या विकासासाठी आपण सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आमच्या कुटुंबात तुम्ही आला आहात.त्यामुळे तुमची जबाबदारी आम्ही घेतली आहे,असे सांगितले.