शिंदे शिवसेनेत प्रवेशाचा धडाका
मिऱया गावातील युवा कार्यकर्त्यांचा उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
प्रतिनिधी
रत्नागिरी
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेशाचा जोरदार सपाटा उमेदवार उदय सामंत यांनी लावला आहे. मिऱया येथील कार्यकर्त्यांसह तेथील ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रवेश केला . तर उक्षी गावचे माजी सरपंच तथा ठाकरे गटाचे अन्वर गोलंदाज यांनीही मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्या मिऱया गावातील ठाकरे शिवसेना गटाला सुरुंग लावण्याचे काम उदय सामंत यांनी केले आहे. येथील अमोल विलणकर, घाऱया मयेकर,दादा शिवलकर, संदीप शिरधनकर, सुरेंद्र शिरधनकर, शशांक सावंत आणि ग्रामपंचायत सदस्य रामदास बनप यांच्या पुढाकाराने शेकडो कार्यकर्त्यांनी सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मिऱया गावात विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. ज्यांनी एमआयडीसीची मागणी केली होती, तेच आता ठाकरे शिवसेनेत गेले आहेत. आजच्या प्रवेशामुळे मिऱया गावात शिवसेनेची ताकद वाढली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनिता शिरधनकर, ग्रामपंचायत माजी सदस्या अनन्या शिवलकर, मृणाली पाटील, ग्रामपंचायत सदस्या राणी भाटकर, अजित शिवलकर, अमित सावत, दीपिका मयेकर, अभी सावंत,सागर कदम, अक्षय सुर्वे, नीलम बनप, विशाखा शिवलकर, रोहिणी सुर्वे, आराध्या सुर्वे, पायल चव्हाण, मुन्ना भाटकर, समीक्षा भाटकर यांच्यासह अनेकांनी भगवा ध्वज स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर तालुक्यातील उक्षी गावचे माजी सरपंच तथा ठाकरे गटाचे अन्वर गोलंदाज यांनीही उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.