तारकर्लीतील युवकांनी हाती घेतली मशाल
पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच - प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया
मालवण । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले पर्सनेट आणि एलईडीद्वारे केल्या जाणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीविरोधात सुरु असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या लढयात आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छीमारांच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत.आमदार झाल्यापासून सातत्याने प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न ते मांडत आहेत. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाईसाठी स्वतः समुद्रात उतरून पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे मच्छिमार समाजा देखील वैभव नाईक यांच्या पाठीशी राहणार आहे. याउलट विरोधी उमेदवाराच्या पक्षातील लोकांचेच पर्ससीन आणि एलईडी ट्रॉलर्स आहेत. त्यामुळे अनधिकृत मासेमारी राजेरोसपणे केली जाते त्याला आळा घालण्यासाठी आपण सर्व युवकांनी आमदारांनी वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले मालवण किनारपट्टीवर सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या आहेत.त्या समस्या दुर करण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांच्या खंबीरपणे पाठीशी राहण्याचे काम आ.वैभव नाईक सातत्याने करतात व पर्यटन व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देतात.एक हक्काचे आमदार म्हणून किनारपट्टी भागातील जनतेने आमदार वैभव नाईक यांच्या सोबत राहण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले आहे.यावेळी अमित केळुसकर,निलेश केळुसकर,विनीत कांदळगावकर, वैभव वळवडकर,अनिकेत केळुसकर, भानुदास केळुसकर,वीरेंद्र देऊलकर, बबन बांदेकर,राजेश केरकर,गुणांक जुवाटकर या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,हरिश्चंद्र केळुसकर,भगवान लुडबे,उपसरपंच दिगंबर मालंडकर,विभाग प्रमुख प्रवीण लुडबे,उपविभाग समन्वयक राजू मेस्त्री,विनोद सांडव,वैष्णवी मेस्त्री,बाबा टीकम,संदीप पवार,प्रिया भोवर,भानुदास केळुसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.