महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उमेदवारी न दिल्यास काँग्रेसमध्ये प्रवेश!

06:17 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरियाणातील दिग्गज भाजप नेत्याची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेता भाजपचे टेन्शन वाढवत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा माजी मंत्री राव नरवीर सिंह यांनी केली काहे. राज्यातील हायप्रोफाइल मतदारसंघ बादशाहपूर येथून उमेदवारीची मागणी ते करत आहेत. या मतदारसंघात वरिष्ठ नेत्या सुधा यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे माजी ओएसडी समवेत अनेक दिग्गज नेते या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

यंदा मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार नाही. 2019 मध्ये मला उमेदवारी मिळाली नव्हती. निवडणुकीच्या मैदानात दोनच पक्ष आहेत. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास मी काँग्रेसमध्ये सामील होणार आहे. बादशाहपूर मतदारसंघात मीच विजयी होणार आहे असा दावा राव नरवीर सिंह यांनी केला आहे.

माजी खासदार सुधा यादव विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. बादशाहपूर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवू पाहत आहेत. अशा स्थितीत नरवीर सिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु पक्षाने आतापर्यंत उमेदवार घोषित केलेले नाहीत. याचबरोबर गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राव इंदरजीत सिंह देखील बादशाहपूर आणि अहिरवाल मतदारसंघात सक्रीय दिसून येत आहेत.

तर 2019मध्ये पराभूत झालेले मनीष यादवही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. खट्टर यांचे माजी ओएसडी जवाहर यादवही बादशाहपूरमध्ये सक्रीय आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल यादवही उमेदवारीसाठी दावा करत आहेत.

मतदारसंघ खास का?

मतदारांच्या दृष्टीकोनातून हा राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. बादशाहपूरमध्ये 4.5 लाख मतदार आहेत. येथे 1.25 लाख अहीर (यादव), 60 हजार जाट, 50 हजार अनुसूचित जातीचे सदस्य, 35 हजार ब्राह्मण आणि 30 हजार पंजाबी मतदार आहेत. तसेच गुज्जर, राजपूर आणि मुस्लीम मतदार देखील आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article