For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उबाठातील फरीद काझी यांच्यासह वाघोटनचे ग्रामपंचायत सदस्य भाजपात

12:09 PM Apr 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
उबाठातील फरीद काझी यांच्यासह वाघोटनचे ग्रामपंचायत सदस्य भाजपात
Advertisement

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा युवासेनेला धक्का

Advertisement

देवगड/ प्रतिनिधी

उबाठा शिवसेनेचे देवगड तालुका युवा सेनाप्रमुख फरीद काझी यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत वाघोटन ग्रामपंचायत सदस्या श्रुती घाडी व दीपाली गोठणकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.याप्रवेश सोहळ्यावेळी भाजपचे पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, माजी तालुकाध्यक्ष अमोल तेली, भाजप युवामोर्चाचे उत्तम बिर्जे, मिलिंद खानविलकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. फरीद काझी यांच्यासह भाजपात दाखल झालेले कार्यकर्ते हे उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने पडेल व विजयदुर्ग परिसरात उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. उबाठा शिवसेना पक्षाची नेतृत्वशैली व कार्यपद्धतीला कंटाळून आपण भाजप पक्षात प्रवेश करीत आहोत. पालक मंत्री नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या जलद व सकारात्मक विकासकामांमुळे ते आता "विकास पुरुष" म्हणून संपूर्ण सिंधुदुर्गचे नेतृत्व करतील, अशी अपेक्षा भाजप प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.