पोईप जि. प मतदारसंघातील शेकडो उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत
आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश
मालवण | प्रतिनिधी : माझी दुसरी इनिंग राणे साहेबांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे. शिंदे साहेबांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि राणे साहेबांची माणसे जपणे हे माझे कर्तव्य आहे. दहा वर्षे मागे पडलेल्या या मतदार संघाचा आणि जनतेला अपेक्षित विकास हेच माझे लक्ष आहे. आमदार म्हणून सुमारे 200 कोटी पेक्षा जास्त विकासनिधी आगामी काळात या मतदारसंघात आणणार. त्या सोबत जिल्हा नियोजन, राज्य सरकार, केंद्र सरकार या माध्यमातून मोठा निधी येतोय. यापुढे येत राहील. शेकडो कोटी विकासनिधीच्या माध्यमातून गावागावात जनतेच्या मागणीनुसार विकास होईल. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन स्पष्ट केले. उबाठातुन अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत आहेत. दहा महिन्यात दहा ते बारा हजार एकूण संख्येने प्रवेश झाले. यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त काम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आहे. त्यांचा शब्द कधी पडू देणार नाही. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या कामाचेही भरभरून कौतुक केले.पोईप धरण येथे पाणी साठवण होत नाही. ओसाड 75 एकर जामीन मध्ये एक उद्योग वसाहत उद्योग मंत्री यांच्या माध्यमातून निर्माण करणार. कारखाना रोजगार निर्मिती करणार. असा शब्द आमदार निलेश राणे यांनी पोईप येथे बोलताना ग्रामस्थांना दिला.उबाठा युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, माजी सरपंच शिवरामपंत पालव यांसह पोईप जिप मतदारसंघातील शेकडो उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, दिपक नारकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, राजन माणगांवकर, सरपंच श्रीधर नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि गावडे, स्वप्नील गावडे, अनिकेत तेंडोलकर, सागर वालावलकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, उपतालुका प्रमुख विजय चव्हाण, अरुण तोडणकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, भाऊ चव्हाण, छोटू ठाकूर, पिंट्या गांवकर, विभागप्रमुख कमलेश प्रभू, बाबू परब, राजू बिडये, मंदार लुडबे, प्रदीप माने, पपू वराडकर, बाळा पालव, स्वरूप वाळके, राहुल बागवे यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : उबाठा युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, माजी सरपंच शिवरामपंत पालव यांसह पोईप जिप मतदारसंघातील शेकडो उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (अनिल तोंडवळकर, बागायत)