For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्योजक गौतम अदानी 2030 पर्यंत सांभाळणार चेअरमनपद

06:58 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
उद्योजक गौतम अदानी 2030 पर्यंत सांभाळणार चेअरमनपद
Advertisement

मुंबई :

Advertisement

दिग्गज उद्योजक गौतम अदानी हे 2030 नंतर कंपनीच्या चेअरमनपदी राहणार नसणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.  ब्लूमवर्ग बिलीनियर इंडेक्सच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.

ब्लूमबर्ग बिलीनियर इंडेक्स यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 62 वर्षीय गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्यानंतर आशियातील दुसरे सर्वात मोठे श्रीमंत उद्योजक आहेत. त्यांच्याजवळ 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची संपत्ती आहे. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर पदावरून हटण्याची योजना बनवत असल्याचे समजते.

Advertisement

कोण सांभाळणार व्यवसाय

आगामी काळामध्ये समूहाची व्यवसायाची धुरा युवा पिढीकडे देण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांचे मुलगे करण, जीत अदानी आणि चुलत भाऊ प्रणव व सागर अदानी हे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.  गौतम अदानी यांचे पुत्र करण हे सध्याला अदानी पोर्टस्चे व्यवस्थापकीय संचालक आहेत तर आणखीन एक पुत्र जीत हे अदानी एअरपोर्टचे संचालक आहेत. त्याचप्रमाणे प्रणव अदानी एंटरप्राईजेसचे संचालक आणि सागर ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक आहेत. अदानी समूहाचे बाजार भांडवल मूल्य 213 अब्ज डॉलरचे आहे.

Advertisement
Tags :

.