पोखरण येथील किर्तन कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद
भगवद्भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेतर्फे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
पोखरण येथे लिंग रवळनाथ मंदिर येथे भगवदभक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग मार्फत तुकाराम बीज हा वत्रर्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास स्थानिक नागरिकातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन व देवर्षी नारद यांचे प्रतिमेच्या पुजनाने झाले. या प्रसंगी पस्थित मान्यवरात भगवद्भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पुनाळेकर, उपाध्यक्ष श्री. काजरेकर, सचिव दिनकर प्रभू खजिनदार किरण पावसकर यांचेसह देवस्थानचे मानकरी श्री. पटेल, केदार सावंत, सौ. केतकी सावंत यांचा समावेश होता. या कार्यक्रमांतर्गत संपुर्ण दिवस अनेक कीर्तनकारांनी कीर्तनचक्री मधून कीर्तन सादर केली. पोखरण ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी श्री. पटेल, तसेच केदार सावंत, सौ. केतकी सावंत यांच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम सकाळ पासून संध्याकाळीपर्यत पार पडला. यावेळी स्थानिक नागरीकांकडून या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.