वेंगुर्ले कॅम्प येथील हिवाळी मोफत प्रशिक्षण शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद
कॅरम, बॅडमिंटन व टेबलटेनिस खेळांचे तज्ञांकडून मोफत प्रशिक्षण
वेंगुर्ले नगरपरिषद व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व इंडियन ऑईल पुरस्कृत हिवाळी खेळ प्रशिक्षण शिबीरास खेळाडूंकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व इंडियन ऑईल पुरस्कृत हिवाळी खेळ प्रशिक्षण शिबीर २०२४ चा शुभारंभ कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाला. या प्रशिक्षणास शनिवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी भेट देवून कॅरम, बॅडमिंटन व टेबलटेनिसच्या तज्ञ मार्गदर्शकांचे स्वागत करून शिबिरातील प्रशिक्षणार्थी मुलांच्या सुविधांचा आढावा घेतला.वेंगुर्ला कॅम्प येथील कै. मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात ५ दिवशीय कॅरम, टेबल टेनीस, बॅडमिंटन व ब्रीज या खेळांचे प्रशिक्षण इंडियन ऑईलच्या तज्ञ मार्गदर्शकांमार्फत देण्यात येत आहे.यावेळी त्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत इंडियन ऑईल तर्फे आलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षकांचा सत्कार केला. कॅरमपटू योगेश परदेशी, बॅडमिंटन तज्ञ दिपांकर भट्टाचारजी, टेबलटेनिस तज्ञ श्रीमती टी. इंदू ब्रीज खेळाचे तज्ञ उदय बेडेकर, यांच्यासह कॅरमची यावर्षीची यूथ राष्ट्रीय उपविजेती सावंतवाडीची केशर निर्गुण, रत्नागिरीची ज्युनिअर आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती आकांक्षा कदम आणि मुंबईचा ज्युनिअर राष्ट्रीय उपविजेता निलांश चिपळूणकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कर्मचारी सागर चौधरी, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष योगेश फणसळकर, हेमंत वालकर, राजेश निर्गुण, प्रविण भोगटे, मालवण येथील टेबलटेनिस प्रशिक्षक विष्णू कोरगावकर, वेंगुर्ला येथील जयराम वायंगणकर व नितिन कुलकर्णी उपस्थित होते.