महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सायकल मॅरेथॉन रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद

09:49 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्य न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

बेळगाव : न्यायालयीन कर्मचारी असोसिएशनच्यावतीने सायकल मॅरेथॉन रॅली तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला. शहरातून पहाटे सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आवारात व्हॉलीबॉल तसेच इतर स्पर्धा पार पडल्या. सायकल मॅरेथॉन रॅलीचे उद्घाटन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प, सैनिक सर्कल, गांधी चौक, सदाशिवनगर, रामदेव, आर. एन. शेट्टी कॉलेज, राष्ट्रीय महामार्ग, किल्ला तलाव, आरटीओ सर्कलमार्गे पुन्हा न्यायालयात सायकलपटूंचे आगमन झाले. यावेळी या सर्वांचे अभिनंदन न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर व्हॉलिबॉल स्पर्धा झाल्या. यामध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी तीन संघ केले होते. दिवसभर विविध स्पर्धा पार पडल्या. यावेळी विविध न्यायालयांचे न्यायाधीश याचबरोबर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article