सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग पतंजली योग समितीचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्यावतीने सावंतवाडीत आयोजित केलेल्या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा ३१ जणांनी लाभ घेतला.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योग प्रसाराचे कार्य वेगाने सुरू असुन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात शंख प्रक्षालन, त्राटक, जलनिती, सूत्रनिती, नस्यनीती, नेत्रनिती, वमन क्रिया, होमहवन, ॲक्युप्रेशर, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम अशा अनेक उपयुक्त योगक्रियांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व योगसाधकांना या शिबिरामुळे प्राप्त झाले.यावेळी सावंतवाडीतील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य डाॅ. मुरलीधर प्रभूदेसाई यांच्याहस्ते श्री शेखर बांदेकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारत स्वाभिमान माजी जिल्हा प्रभारी श्री महेश भाट, युवा भारत सह तहसिल प्रभारी श्री तेजस परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पतंजली योग समितीचे जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यप्रभारी श्री. बापू पडळकर, राज्यप्रभारी श्री. चंद्रशेखर खापणे, श्री. शेखर बांदेकर, डॉ. तुळशीराम रावराणे, श्री. प्रकाश कोचरेकर, वैद्य श्री सुविनय दामले, श्री. मयुरेश गवंडळकर, श्री. लक्ष्मण पावसकर अशा सर्व योगशिक्षकांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबली गवंडे यांनी सूत्रसंचालन शकु अंकिता नेवगी तर आभार प्रदर्शन अनघा चव्हाण यांनी केले.या शिबिरात श्री योगेश येरम, श्री विशाल लातये, कु अंकिता नेवगी, श्री किसन ठोंबरे, श्री बाबली गवंडे, श्री अनिल मेस्त्री, श्री आनंद साधले, श्री रामनाथ सावंत, सौ. रसिका सावंत, श्री अरुण पवार, श्री रामचंद्र सावंत, श्री अनिल खाडे, श्री अमित कांबळे, श्री गोविंद सावंत, श्री महेश तुर्केवाडकर, श्री महादेव सावंत, चंद्रशेखर नाईक, रवींद्र प्रभूदेसाई, बाबली राऊळ, नंदकिशोर कोंडये, सौ मृणाली गवंडे, सौ अनघा चव्हाण, सौ स्नेहा नाईक, सौ संजना परब, सौ विशाखा रांगणेकर, सौ प्रज्ञा चौगुले, सौ सिमा सावंत, सौ चेतना शिंदे, सौ विनया तावडे, सौ भक्ति गवस, सौ रक्षा देसाई आदी ३१ जणांनी प्रशिक्षण घेतले.