डेगवेत काजू व आंबा पीक संरक्षण प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
काजू व कोको बोर्ड, फळ संशोधन केंद्र आणि कृषी विभागाचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
काजू व कोको बोर्ड (कोचीन), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र (वेंगुर्ला) आणि कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने काजू व आंबा पीक संरक्षण मोहिमेअंतर्गत डेगवे येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाला बागायतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी कीटक शास्त्रज्ञ, डॉ. विजयकुमार सीताराम देसाई, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. एम. पी.सणस, कनिष्ठ काजू पैदासकार एल. एस. खापरे, आंबा संशोधन सहयोगी हॉर्टसप डॉ. गोपाळ गोळवणकर, आत्मा बीटीएम मिनल परब, सरपंच राजन देसाई, चंद्रशेखर देसाई, नाना देसाई, प्रगतशील शेतकरी आबा देसाई, मधुकर देसाई, बांदा कृषी विभाग अधिकारी युवराज भुईम्बर, श्री घाडगे, मिलिंद निकम, अतुल माळी आदी उपस्थित होते.
या एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणात शेतकऱ्यांना सकाळच्या सत्रात मार्गदर्शन विविध विषयावर सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात काजू बागेत पीक संरक्षण विषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच रब्बी हंगामात होणा-या मिरची पिकावरील वरील चुरडा मुरडा नियंत्रणाबाबत आणि गादीवाफ्यावरील भुईमूग लागवडबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षणाचे नियोजन डेगवे कृषी सहायक अतुल माळी आणि डेगवे गावातील प्रगतशील शेतकरी आबा देसाई यांनी केले होते. यावेळी डेगवे व पडवे माजगाव गावातील शेतकरी उपस्थित होते.