दमदार तेजीसोबत शेअरबाजारात पसरला उत्साह
सेन्सेक्स 579 अंकांनी वधारला, कच्चे तेल 70 डॉलरवर घसरले, आयटीची चमक
वृत्तसंस्था/मुंबई
आयटी निर्देशांकाच्या हजार अंकांच्या दमदार तेजीसोबत ऑटो निर्देशांकाची कामगिरी शेअरबाजाराला तेजी राखण्यात हातभार लावणारी ठरली. सेन्सेक्स 579 अंक व निफ्टी 169 अंकांनी वधारले होते. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 77502 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टीसुद्धा 169 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला होता. आयटी या निर्देशांकाने गुरुवारी दमदार कामगिरी नेंदवत सेन्सेक्सच्या तेजीला हातभार लावला. निफ्टी बँक निर्देशांक मात्र सपाट स्तरावर बंद झाला.
हे समभाग वधारले
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी आयटी निर्देशांकाने दमदार बॅटींग केलेली दिसून आली. विविध समभागांची कामगिरी पाहता इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट, टाटा स्टील, ग्रासिम, अपोलो हॉस्पिटल, कोल इंडिया, हिंडाल्को, डॉ. रेड्डिज लॅब्ज, एसबीआय, एनटीपीसी, ओएनजीसी, एशियन पेंटस्, बजाज ऑटो, भारती एअरटेल, इंडिगो, जेएसडब्ल्यू स्टील, एचयुएल, आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टाटा कंझ्युमर, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा यांचे समभाग तेजीत होते. मिडकॅप निर्देशांकातील एक्साइड, टाटा टेक, पर्सिस्टंट सिस्टम्स, अपोलो टायर्स, एम्पसीस व सोना बीएलडब्ल्यू प्रीसीशन यांचे समभाग मजबूत होत बंद झाले.
हे समभाग घसरले
दुसरीकडे पाहता लार्सन टुब्रो, मारुती सुझुकी, बीईएल, अॅक्सिस बँक, कोटक बँक, रिलायन्स यांचे समभाग सर्वाधिक घसरले होते. तसेच आयटीसी, एचडीएफसी बँक, सिप्ला, एसबीआय लाइफ, टाटा मोटर्स पीव्ही, जियो फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर या निफ्टीतील समभागांनी व मिडकॅपमधील सीजी पॉवर, पेज इंडस्ट्रिज, जीएमआर एअरपोर्टस, कमिन्स, पेट्रोनेट एलएनजी या समभागांनी निराशादायी कामगिरी केली होती.
एनर्जी निर्देशांक मात्र नुकसानीत
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता फक्त एनर्जी निर्देशांक कमकुवत होत बंद झाला. तर सर्वात दमदार कामगिरी नोंदवली ती अर्थातच आयटी निर्देशांकाने. हा निर्देशांक तब्बल 1195 अंकांनी वधारत 26965 अंकांवर बंद झाला होता. यापाठोपाठ ऑटो निर्देशांक 325 अंकांनी वधारत 27108 अंकांवर तर एफएमसीजी निर्देशांक 277 अंकांनी वधारत 50084 अंकांवर बंद झालेला दिसला. याशिवाय कमोडिटीज, फायनॅन्शीयल्स, मेटल, ऑईल व गॅस, इन्फ्रा, सीपीएसई, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक मजबूतीसोबत बंद झाले.

- इन्फोसिस 1041
- टेक महिंद्रा 1421
- टीसीएस 2067
- एचसीएल टेक 1077
- बजाज फिनसर्व्ह 1856
- अदानी पोर्ट 1882
- टायटन 4472
- आयसीआयसीआय 1399
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3173
- हिंदुस्थान युनि 2210
- टाटा स्टील 187
- एशियन पेन्ट्स 2742
- इंटरग्लोब एव्ही. 5447
- अल्ट्राटेक सिमेंट 11560
- ट्रेन्ट 3318
- स्टेट बँक 1051
- बजाज फायनान्स 1018
- सनफार्मा 1870
- पॉवरग्रिड कॉर्प 288
- एनटीपीसी 358
- इटर्नल 279
- एचडीएफसी बँक 796
- भारती एअरटेल 1870
- श्री सिमेंट 26199
- कोल इंडिया 438
- हिंडाल्को 948

- लार्सन अॅण्ड टुब्रो 4060
- मारुती सुझुकी 14351
- अॅक्सिस बँक 1363
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1303
- भारत इले. 415
- कोटक महिंद्रा 399
- आयटीसी 289
- बँक ऑफ बडोदा 260
- कमिन्स 5571
- मॅक्स हेल्थकेअर 1127
- कोलगेट 2055
- टीएमपीव्ही 346
- एसबीआय लाईफ 1785
- पी.बी.फिनटेक 1679
- जिओ फायनान्स 239