For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोवीस तासानंतरही विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायम

07:04 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
चोवीस तासानंतरही विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायम
Advertisement

रात्री 8 वाजले तरी 40 गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सुरु झालेली विसर्जन मिरवणूक शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरुच होती. प्रशासनाने डीजेवर निर्बंध घातल्याने हालगी व ढोल ताशाच्या निनादात रात्री उशीरापर्यंत मिरवणूक सुरु होती. गुलालाच्या उधळणीत तरुणाई थिरकत होती. 24 तास उलटले तरी मिरवणुकीचा उत्साह मात्र ‘जैसे थे’ च होता.

Advertisement

प्रशासनाने आवाहन करून देखील काही गणेशमूर्ती शनिवारी सकाळी मंडपातून बाहेर काढण्यात आल्या. त्यामुळे धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली व कपिलेश्वर उ•ाण पूल येथे गणेशमूर्ती एकामागून एक उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. विसर्जन तलावात विसर्जनासाठी विलंब होत असल्याने गणेशमूर्ती एकामागे एक थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे लवकरात लवकर विसर्जनासाठी पोलिसांसह महानगरपालिका मेहनत घेत होती.

शनिवारी रात्रीपर्यंत झालेल्या विसर्जनाची आकडेवारी पाहता रविवारी पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणूक चालण्याची शक्यता आहे. रात्रीपर्यंत शहरातील काही मूर्ती रामलिंगखिंड गल्ली, गोवावेस व शहापूर भागातच होत्या. यामुळे या परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तरुणाई पारंपरिक वाद्यांवर थिरकत जल्लोषाने मिरवणुकीत सहभागी झाली होती.

विसर्जनाचे प्रशासनासमोर आव्हान

यावर्षी सर्रास मंडळांनी गणेशमूर्तींची उंची वाढविल्याने प्रशासनासमोर विसर्जनाचे आव्हान होते. बेळगावसह उपनगरातूनही गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात आणण्यात आल्या. शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत जुन्या तलावात 28 तर नवीन तलावात 116 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. अद्याप 40 गणेशमूर्तींचे विसर्जन होणे बाकी होते. परंतु उर्वरीत सर्व मूर्ती उंचीने मोठ्या असल्याने मध्यरात्रीनंतर विसर्जन योग्यप्रकारे होईल की नाही याचे आव्हान प्रशासनासमोर होते.

विसर्जन तलाव केला मोकळा

नवीन कपिलेश्वर तलावावर मोठ्या प्रमाणात शनिवारी गर्दी झाली होती. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनामध्ये अडथळे येत होते. विसर्जन करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने भाविकांना तेथून हटविले. तलाव मोकळा करून केवळ विसर्जनासाठी जाणाऱ्या मंडळांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात होता. तरीदेखील उ•ाण पुलासह दोन्ही विसर्जन तलाव परिसरात रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी होती.

शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंतची आकडेवारी

► कपिलेश्वर नवीन तलावात विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती -116

► कपिलेश्वर जुन्या तलावात विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती - 28

► विसर्जन न झालेल्या गणेशमूर्ती - 40

Advertisement
Tags :

.