कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘करमणूक’वर इतर कामांचाच भार

11:59 AM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत : 

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग हा नावा पुरताच करमणूक कर विभाग राहिला आहे. सध्या या विभागातील बहुतांशी कामकाज जीएसटी विभागाकडे वर्ग झाले आहे. सहाजिकच करमणूक कर वसुलीची जबाबदारीही कमी झाली आहे. या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे करमणूक कराची कामे कमी आणि इतर कामे जास्त अशी स्थिती झाली आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत महसूल मिळवून देणारी प्रमुख काही विभाग आहेत. यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय, खणीकर्म विभागाचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाला 10 कोटींचा महसूल जमा करून देण्याचे महत्वाची कमागिरी करमणूक कर विभाग करत होता. चित्रपट गृह, केबल व्यावसायिक, चित्रीकरण, व्हिडीओ गेम्स यांच्याकडून करमणूक कर वसुली केली जात होती. लॉजिंग परवानेही याच विभागांतर्गत देण्यात येत होते. 2017 पासून जीएसटी लागू झाल्यानंतर मात्र, या विभागाच्या वसुलीवर आमुलाग्र बदल झाले. कररणूक कर विभागाकडील चित्रपट गृह, केबल व्यावसायिकांकडील करमणूक कर वसुलीचे अधिकारकाढून घेऊन ते जीएसटी विभागाकडे वर्ग करण्यात आले. यामुळे करमणूक कर विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला. येथील वसुलीचे काम, कार्यालयीन कामेही कमी होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून हा विभाग इतर विभागात विलीन करण्याऐवजी या विभागाकडे इतर कामांची जबाबदारी देणे सुरू झाले. सध्या या विभागाकडे करमणूक कर वसुलीचे काम कमी आणि वर्षभरात इतर कामांचीच जबाबदारी जास्त दिली जात आहेत.

कोल्हापुरातील करमणूक कर विभाग वसुलीत टॉपवर होता. दरवर्षी 90 टक्के वसुली होत होती. या विभागातून 10 कोटींचे उत्पन्न मिळत होते. एकपडदा व बहुपडदा चित्रपटगृहे, फिरते चित्रपटगृह, व्हिडिओ सिनेमा, केबल, डीटीएच सेवा, व्हिडिओ गेम या करमणूक केंद्रांना करआकारणी केली जात होती. आता दोन लाखही वसुली होत नाही, अशी स्थिती आहे. 2024-25 या वर्षात केवळ दीड लाखच वसुली झाली आहे.

लोकशाही दिन, जनता दरबार, पी.जी. पोर्टल, आपले सरकार पोर्टल, जनगणना संकलन, 100 दिवसांचा कृती आराखडा, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व माहिती अधिकार कामकाज, इत्यादी विषयांचे पर्यवक्षेण कामकाज, ई ऑफीस प्रणालीचे समन्वय, युनोस्क संदर्भातील कामकाज

करमणूक कर हा राज्य शासन वसुल करत होते. जीएसटीमुळे याचे केंद्रीयकरण झाले आहे. राज्यातून केबल व्यावसायिक, जीएसटीसह अन्य करमणूक कराची रक्कम जीएसटी अंतर्गत घेतली जात आहे. जमा होणारा जीएसटी केंद्राकडे थेट जमा होतो. यानंतर तो राज्य शासनांना अनुदान स्वरूपात परत केला जातो.

जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असणाऱ्या करमणूक कर विभागामुळे करमणूक कर चुकविणाऱ्यांवर वचक होती. केबलची कनेक्शन कमी दाखवून कर बुडविणाऱ्यांवर तपासणीसाठी करमणूक कर निरिक्षक जागेवर जाऊन तपासणी करत होते. आता जीएसटीमधूनच करमणूक कर जमा होत आहे. यामध्ये करमणूक कर नेमका किती जमा होतो. याची स्पष्टता येत नाही. याचबरोबर मालिका, चित्रपटासाठी कोलपुरात चित्रकरण झाली. मात्र, 100 टक्के करमणूक कर जमा झालेला नाही. संबंधितांवर कारवाईसाठी सध्या करमणूक कर विभागाकडे तोकडी यंत्रणा आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही इतर विभागातील कामांची जबाबदारी आहे.

करणमूक कर विभागाची 2024-25 मधील वसुली -1 लाख 50 हजार

करमणूक कर विभाची 2017 पूर्वी होणारी वसुली -10 कोटी

कार्यक्रम                              कार्यक्रम संख्या

मनोरंजन कार्यक्रम                       40

यात्रा                                       11

चित्रीकरण                                 3

सर्कस, फनफेअर                        2

एकूण कार्यक्रम                        56

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article