For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाजसेवा हेच ध्येय ठेऊन राजकारणात या : मुख्यमंत्री

07:45 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
समाजसेवा हेच ध्येय ठेऊन राजकारणात या   मुख्यमंत्री
Advertisement

विजयवाडा आंध्रप्रदेश येथे युवा नेत्यांना मार्गदर्शन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे तसेच समाजसेवा हे ध्येय ठेऊन  तऊणांनी राजकारणात यावे. त्यानंतर पद किंवा सत्ता यांची अपेक्षा आपोआप पूर्ण होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Advertisement

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे आयोजित ‘विकसित भारत 2047-युवा राजकीय नेते संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. तेथील भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना त्यांनी, राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तऊणांनी आधी समाजातील विविध घटकांशी अखंड संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात व त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत. अशाप्रकारे राजकीय, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा अनुभव आत्मसात करणे प्रत्येक लोकप्रतिनिधीची ही प्राथमिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

राजकारण हे केवळ पद मिळविण्याचे माध्यम नसून जनसेवेचे प्रभावी साधन आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी तऊणांनी देशातील राजकीय व्यवस्था, लोकशाहीची मूल्ये आणि जनतेच्या प्रश्नांचे आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यास भविष्यातील राजकीय नेतृत्व अधिक सक्षम होईल, असे सावंत यांनी सांगितले.

देशाच्या विकास प्रक्रियेत तऊणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तऊणांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ निर्माण झाली, तर देशाला सक्षम आणि संवेदनशील नेतृत्वाची नवी पिढी मिळू शकते, त्यातूनच वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार असून त्याकामी युवा पिढीची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.