For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पाकिस्तानात घुसून बदला घ्या !

06:28 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात घुसून बदला घ्या

 अफगाण तालिबानचा इशारा : कमांडरचा व्हिडिओ लीक

Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

अफगाण तालिबान कमांडर याह्याने टीटीपीच्या सैनिकांना पाकिस्तानात घुसून हल्ले करण्यास सांगितले आहे. याह्याने तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) हस्तकांना पाकिस्तानात घुसून बदला घेण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानी लष्कर अत्याचार करत असून त्यांना धडा शिकवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तालिबानी कमांडरने टीटीपीच्या हस्तकांसमोर केलेल्या  भाषणात केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये काही काळापासून सुरू असलेल्या तणावादरम्यान अफगाण तालिबान कमांडरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो उघडपणे टीटीपीला पाठिंबा देत आहे. टीटीपी दहशतवादी हल्ले घडवून आणत असल्याचा आरोप पाकिस्तान सातत्याने करत आहे.

Advertisement

अलिकडेच लीक झालेल्या व्हिडिओमध्ये याह्या हाफिज गुल बहादूर ‘टीटीपी’ दहशतवादी गटाच्या हस्तकांना संबोधित करताना दिसत आहे. यामध्ये याह्या टीटीपीला पाकिस्तानच्या सुरक्षा दलांविऊद्ध भडकवत आहे. सर्वांनी आदेशाचे पालन करण्यास तयार व्हावे. आता पाकिस्तानशी मुकाबला करण्यासाठी आपल्याला वेगाने पुढे जावे लागेल, असे निर्देशही तालिबनी कमांडरने दिले आहेत. व्हिडिओमध्ये याह्या पाकिस्तानकडून बदला घेण्यासाठी तयार राहण्यावर भर देत आहे. तसेच रॉकेट लाँचर, स्नायपर आणि लेझर ऑपरेटर कसे वापरायचे त्याबद्दलही बोलताना दिसत आहे. इतकेच नाही तर एका व्यक्तीला सुसाइड बॉम्बर असेदेखील म्हणत आहे.

Advertisement

‘जखमी करू नका, मारून टाका’

व्हिडिओमध्ये याह्या टीटीपीच्या हस्तकांना पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचे निर्देश देताना कठोर शब्दात बोलताना दिसत आहे. यावेळी ‘एकही जखमी व्यक्ती मागे राहू नये, सर्वांना मारून टाका’ असेही सांगत आहे. त्याला दूर केले पाहिजे. हा लीक झालेला व्हिडिओ अफगाणिस्तानातील डांगर अलगड भागातील असल्याचा दावा जिओ न्यूजने केला आहे. येथे टीटीपीचे दहशतवादी कमांडर याह्याभोवती जमले आहेत. हे लोक अफगाणिस्तान सीमेवरून पाकिस्तानात घुसखोरी करून पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ल्याची योजना आखत असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Tags :
×

.