For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रवेश करा, हाती लागेल ते उचलून न्या!

06:02 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रवेश करा  हाती लागेल ते उचलून न्या
Advertisement

जपानच्या स्टोअरमध्ये चोरीची पूर्ण मोकळीक

Advertisement

टोकियोत सध्या एक असा स्टोअर चर्चेत आहे, ज्याची अनोखी स्कीम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे काही सामान्य दुकान नसून येथे येणाऱ्या लोकांना चोरी करण्याची पूर्ण मोकळीक दिली जाते. स्टोअरच्या नियमांनुसार आत प्रवेश केल्यावर व्यक्तीला पूर्ण 60 सेकंद मिळतात, ज्यात तो कपडे, अॅक्सेसरीज, गॅझेट्स किंवा अन्य कुठलेही सामान उचलू शकतो. परंतु ही ऑफर जितकी आकर्षक वाटते तितकीच आव्हानात्मक आहे. कारण याच्या सोबत काही कठोर अटीही जोडलेल्या आहेत.

या स्टोअरचे नाव टीओएच आहे. जपानी भाषेत टीओएच हा चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या एक अक्षराच्या उच्चारणांपैकी एक आहे. हा स्टोअर 13-16 मार्चपर्यंत 4 दिवसांसाठी पुन्हा खुला केला जाणार आहे. मागील वर्षी जेव्हा हा पहिल्यांदा सुरू झाला होता, तेव्हा हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. परंतु अनेकदा लोकांना कित्येक तासांपर्यंत रांगेत उभे रहावे लागले होते, या अनोख्या प्रयोगाचे आयोजन एका रेडिओ कार्यक्रमाशी निगडित कलाकारांकडून करण्यात आले होते.

Advertisement

काय आहेत अटी

या स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी 1 हजार येन द्यावे लागतात. आतील वातावरण एखाद्या भूमिगत बाजारासारखे तयार करण्यात आले आहे, प्रवेश मिळताच तुमच्याकडे 60 सेकंद असतात, ज्यात हाताला लागेल ते उचलता येते. मग यात कपडे, अॅक्सेसरीज किंवा तंत्रज्ञानाशी निगडित कुठलेही सामान असू शकते. परंतु या पूर्ण सेटअपमध्ये सर्वात मोठे आव्हान शांतता आहे. स्टोअरच्या प्रत्येक कोपऱ्यात अत्यंत संवेदनशील मायक्रोफोन लावण्यात आले आहेत, जे किंचित कृत्यही टिपते. जरा जरी आवाज झाला तर तुम्हाला त्वरित बाहेर पाठविले जाते. यानंतर कुठलेच सामान मिळत नाही, तसेच पुन्हा प्रयत्न करण्याची संधी दिली जात नाही.

चोरी करणाऱ्यांचा अनुभव

मागील वर्षी ही संकल्पना वेगाने व्हायरल झाली होती. ज्यानंतर मोठी गर्दी निर्माण झाली होती. अनेकदा लोकांना स्टोअरमध्ये प्रवेशासाठी कित्येक तासांसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. या स्टोअरचे वातावरण एखाद्या गुप्त किंवा अंडरगाउंड मार्केटसारखे ठेवण्यात आले असून यात आत जाणाऱ्यांचा रोमांच आणि तणाव दोन्ही वाढत असतो. 60 सेकंदांच्या आत सामान उचलणे आणि मग बहेर पडणे, ते देखील कुठल्याही आवाजाशिवाय लोकांसाठी मोठे आव्हान ठरते. ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आहे, त्यांच्यानुसार सर्वात अवघड काम सामान उचलणे नव्हे तर स्वत:ला पूर्णपणे शांत ठेवणे आहे.

Advertisement
Tags :

.