महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तर गणेश भक्तांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल

03:53 PM Aug 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अखंडित वीज पुरवठा गणेशोत्सवापूर्वी सुरळित करा ; सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेचा महावितरण उपअभियंत्याना इशारा

Advertisement

ओटवणे |  प्रतिनिधी
गणेशोत्सवात सावंतवाडी तालुक्यात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याबाबत अगोदरच नियोजन करावे अन्यथा ऐन गणेशोत्सवात वीजपुरवठा सुरळीत न ठेवल्यास ग्राहकांसह गणेश भक्तांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा महावितरणचे सावंतवाडी तालुका उप अभियंता शैलेश रक्षे यांना सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना आणि तालुक्यातील वीज ग्राहकांच्या बैठकीत देण्यात आला.या बैठकीत मळगाव येथील सौ. मेघना राऊळ यांनी देऊळवाडीत वीज खांब वाकलेला असून वीज वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. आरोस येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मळेवाड येथून वीज जोडणी द्यावी अशी अनेक वर्षांची मागणी आहे. इन्सुली येथील उल्हास सावंत यांनी आवश्यक तेथे गार्डिंग करण्याबाबत, प्रकाश सावंत यांनी देवसू - पारपोली रस्त्यावरील वीज वाहिन्या एसटी गाड्यांना लागत असल्याबाबत, तळवडे बौद्धवाडी येथे वाकलेला विज खांब आणि कमी दाबाच्या विज समस्या, पोलीस अधिकारी नागेश तेली यांनी सी के डब्ल्यू एस इंडस्ट्रियल एरिया मध्ये खंडित वीज पुरवठ्याबाबत तसेच यावेळी सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपापल्या भागातील विविध समस्या मांडून त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली.या बैठकीत सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष संजय लाड (माडखोल) यांची फेरनिवड करण्यात आली. तर सचिवपदी सचिव असलम खतीब (बांदा) यांची निवड करण्यात आली. संजय लाड यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने तालुका कार्यकारिणीच्या विविध गावांमध्ये बैठका घेऊन गावोगावी जनजागृती करीत वीज ग्राहक संघटनेसाठी उत्तम कार्य केल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी शामसुंदर रेडकर (तळवडे), जयप्रकाश सावंत, विनोद मोहिते (देवसु), मनोहर देसाई (इन्सुली), जेरोन बस्त्याव (माजगाव), विष्णू कदम (सांगेली) आदी सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निवडण्यात आलेली सावंतवाडी तालुका कार्यकारिणी प्रमाणे अध्यक्ष संजय भिकाजी लाड (माडखोल), सचिव असलम खतीब (बांदा), उपाध्यक्ष आनंद नेवगी (सावंतवाडी), उपाध्यक्ष संतोष तावडे (ओटवणे) उपाध्यक्षा सौ. मेघना राऊळ (मळगाव), सहसचिव समीर शिंदे (देवसू), खजिनदार मनोज घाटकर (कुणकेरी), तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर (जिल्हा उपाध्यक्ष), सदस्य जगदीश मांजरेकर (व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष) पुंडलिक दळवी, जिल्हा सचिव दीपक पटेकर, राजेंद्र सावंत (सावंतवाडी), काशिनाथ न्हावेलकर (सावंतवाडी), श्रीकृष्ण तेली (मळगाव), रामचंद्र राऊळ (तळवडे), गिरीश रेडकर (तळवडे), सुनील सावंत (कलंबिस्त) उल्हास सावंत (इन्सुली), शैलेश कुडतरकर (सावरवाड)

Advertisement

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat sindhudurg # news update # tarun bharat official
Next Article