For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असंघटित कामगारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून द्या

11:20 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
असंघटित कामगारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून द्या
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना 

Advertisement

बेळगाव : असंघटित कामगारांना वृद्धापकाळी सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन पेन्शन योजना सुरू केली आहे. जिह्यातील असंघटित कामगारांची नोंद घेऊन त्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. मंगळवारी (दि. 3) जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन योजनेंतर्गत असंघटित कामगारांच्या नोंदणी संदर्भातील विशेष अभियानाची पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. राज्यात बेळगाव जिल्हा सर्वात मोठा असून जिह्यात शेतीकामगार, मनरेगा कामगार, अंगणवाडी कर्मचारी, अक्षर दासोहचे कर्मचारी, बैठे विक्रेते तसेच कौशल्य़ाधारित काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करून त्यांना योजनेत समाविष्ट करून घ्यावे.

ग्रामीण, शहर, स्थानिक पातळीवर योजनेचा प्रचार करण्यात यावा. विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिह्यातील अधिकाधिक असंघटित कामगारांना प्रधानमंत्री  श्रमयोगी मान-धन योजनेमध्ये समाविष्ट करावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. असंघटित कामगार 18 ते 40 वर्षे वयेगटातील असावा. मासिक उत्पन्न 15 हजारापेक्षा कमी असावे. प्राप्तीकर, इएसआय, पी.एफ., एन.पी.एस. यासारख्या योजनांचा लाभ घेत नसावा. असंघटित सामान्य सेवा केंद्र (सीएससी) यावर नोंदणी करावी. टोल फ्रीकॉल सेंटर संख्या 1800-267-6888, एलआयसी वेबसाईट पत्ता- http://www.licindia.in, नजिकच्या सीएससी सेंटरवरून माहिती मिळविण्यासाठी https://locator.csccloud.in, तसेच कामगार   सहाय्यवाणी 155214 वर संपर्क स़ाधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.