For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा वनडे संघ जाहीर

05:15 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा वनडे संघ जाहीर
Advertisement

जोश टंग, जेम्स कोल्स दोन नव्या चेहऱ्यांना संधी

Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

चालू महिन्याच्या अखेरीस भारताबरोबर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने शुक्रवारी 16 सदस्यांचा संघ जाहीर केला असून हॅरी ब्रुककडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये अष्टपैलू जेम्स कोल्स आणि वेगवान गोलंदाज जोश टंग हे दोन नवे चेहरे आहेत.

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. आता उभय संघातील वनडे सामने, 14, 16 आणि 19 जुलैला अनुक्रमे बर्मिंगहॅम, कार्डिफ आणि लॉर्ड्स मैदानावर खेळविले जाणार आहे. इंग्लंड संघामध्ये अॅटकिन्सन आणि साकिब मेहमुद या वेगवान गोलंदाजांनाही संधी मिळाली आहे. या मालिकेत भारतीय संघातून विराट कोहली खेळणार असला तरी त्याची उपलब्धता तंदुरुस्तीवर अवलंबून राहील. मात्र रोहीत शर्मा व जसप्रीत बुमराह या मालिकेत निश्चित खेळणार आहेत. इंग्लंड संघामध्ये वेगवान गोलंदाज आर्चरचाही समावेश करण्यात आला आहे. 2025 च्या नोव्हेंबरनंतर आर्चरचे इंग्लंडच्या वनडे संघात पुनरागमन होत आहे.

इंग्लंड संघ : हॅरी ब्रुक (कर्णधार), बॅन्टन, बेथेल, रूट, डकेट, बटलर, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, अॅटकिन्सन, कोलेस, सॅम करन, डॉसन, साकिब मेहमुद, आदिल रशीद आणि जोश टंग.

Advertisement
Tags :

.