For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडचा लंकेवर वनडे मालिका विजय

06:25 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा लंकेवर वनडे मालिका विजय
Advertisement

तिसऱ्या सामन्यात 223 धावांनी मात, टॉम बॅन्टन ‘सामनावीर’, विल जॅक्स ‘मालिकावीर’

Advertisement

वृत्तसंस्था, ओव्हल

इंग्लंडच्या दौऱ्यावर लंकन क्रिकेट संघाला वनडे मालिका गमवावी लागली आहे.  तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडने लंकेचा 2-1 असा पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने लंकेचा 223 धावांनी दणदणीत पराभव केला. इंग्लंडच्या टॉम बॅन्टनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या सामन्यात शानदार शतक (126) झळकविले. इंग्लंडच्या विल जॅक्सला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 355 धावा जमवित लंकेला विजयासाठी 356 धावांचे कठीण आव्हान दिले. पण त्यानंतर इंग्लंडच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 29.1  षटकांत 132 धावांत आटोपला.

इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या बॅन्टनने 105 चेंडूत 5 षटकार आणि 16 चौकारांसह 126 धावा झळकविल्या. मात्र सलामीचा डकेट दुसऱ्याच षटकांत खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत झाला. अनुभवी रुट लियानगेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 1 चौकारासह 18 धावा केल्या. बॅन्टन आणि कर्णधार ब्रुक यांनी तिसऱ्या गड्यासाठी 150 धावांची दीडशतकी भागिदारी केली. कर्णधार ब्रुकने 66 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 77 धावा झळकविल्या. फर्नांडोने त्याला झेलबाद केले. कोलमबागेने बॅन्टनला मलिंगाकरवी झेलबाद केले. ब्रुक आणि बॅन्टन बाद झाल्यानंतर कॉक्स आणि जॅक्स यांनी इंग्लंडच्या सुस्थितीत नेले. कॉक्सने 52 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 76, जॅक्सने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, ओव्हरटनने 1 चौकारासह नाबाद 21 धावा जमविल्या.

इंग्लंडच्या डावामध्ये 10 षटकार आणि 35 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकांत 50 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पॉवरप्लेदरम्यानच्या 30 षटकांत 201 धावा जमविताना 3 गडी गमविले. शेवटच्या 10 षटकांत इंग्लंडने 104 धावा जमविताना 3 गडी गमविले. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 64 धावांत 3 तर कोलमबागेने 71 धावांत 2 तसेच लियानगे आणि मधूशंका यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव केवळ 29.1 षटकांत 132 धावांत आटोपला. लंकेच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार कुशल मेंडीसने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 35, लियानगेने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, मलिंगाने 2 चौकारांसह 14, रत्नायकेने 2 चौकारांसह 18, कमिंदू मेंडीसने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. इंग्लंडतर्फे डॉसनने 26 धावांत 3 तर अॅटकिनसनने 26 धावांत 2 बळी मिळविले. बेकर, जॅक्स, रुट आणि ओव्हरटन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. लंकेच्या डावामध्ये 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकांत 63 धावा जमविताना 3 गडी गमविले. तर दुसऱ्या पॉवरप्लेदरम्यानच्या 30 षटकांत लंकेचे 7 गडी 63 धावांत बाद झाले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 7 बाद 355 (बॅन्टन 126, ब्रुक 77, कॉक्स 76, जॅक्स 25, ओव्हरटन नाबाद 21, अवांतर 12, असिता फर्नांडो 3-64, कोलंबागे 2-71, लियानगे, मधूशंका प्रत्येकी 1 बळी), लंका 29.1 षटकांत सर्वबाद 132 (कुशल मेंडीस 35, रत्नायके 18, लियानगे 19, कमिंदू मेंडीस 12, मलिंगा 14, अवांतर 9, डॉसन 3-26, अॅटकिनसन 2-26, बेकर, जॅक्स, रुट व ओव्हरटन प्रत्येकी 1 बळी.

Advertisement
Tags :

.