For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडचा मोईन अली क्रिकेटमधून निवृत्त

06:19 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा मोईन अली क्रिकेटमधून निवृत्त
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंडचा अष्टपैलू 37 वर्षीय मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मोईन अलीने 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधीत्व करताना आपली क्रिकेटची प्रतिमा उभी केली.

2024 च्या झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मोईन अलीने अलिकडच्या कालावधीत आपला शेवटचा सामना खेळला होता. क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन मोईन अलीने केले आहे. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने मोईन अलीची अलिकडेच खास मुलाखत घेतली होती. 2025 ला होणारी आयसीसीची चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा तसेच 2026 सालातील होणाऱ्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड संघाच्या पुनरबांधणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 2014 साली मोईन अलीने विंडीज विरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने 6,678 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत 366 गडी बाद केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.