For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत इंग्लडंची भारतावरील आघाडी वाढली

06:34 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत इंग्लडंची  भारतावरील आघाडी वाढली
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

महिलांच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत,इंग्लंडने विद्यमान विश्वविजेत्या भारतावरील आपली आघाडी वाढवली आहे.इंग्लड 128 गुणांसह दुसऱ्या क्रमांवर असून,त्यांनी भारतावर स्पष्ट 4 गुणांची आघाडी घेतली आहे.तर हरमनप्रीत कौरचा संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.163 गुणंसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम आहे.मागिल वर्षी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून आपला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारताने,त्यांनतर केवळ तीनच एकदिवसी सामने खेळले आहेत.या समान्यांमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मलिकेत 0-3 असा दारुण पराभव पत्करावा लागला होता.इंग्लडने भारतावरील आपली आघाडी एका गुणावरुन वाढवून चार गुणंपर्यंत नेली आहे आणि त्यांचे एकूण गुण 128 झाले आहेत.भारत 124 दक्षिण आफ्रिका 100 न्यूझीलंड आणि श्रीलंका 89 हे इतर संघ आपापली स्थाने कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत असे आयसीसीने एका प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.यापूर्वीच्या क्रमवारीत भारताकडे 125 गुण होते,जे इंग्लंडच्या 126 गुणंपेक्षा केवळ एक गुणच कमी होते.दरम्यान,चार गुणांची घट होऊनही,ऑस्टेलियाने क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या अद्ययावतीकरणानंतर श्रीलंकेच्या गुणांमध्ये सहा गुणांची वाढ झाली आहे,ज्यामुळे न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या गुणांमध्ये सहा गुणांची वाढ झाली आहे, ज्यामुळे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील गुणांचे अंतर 13 वरुन कमी होऊन 4 वर आले आहे.दुसरीकडे बांगलादेशने पकिस्तानला मागे टाकत सातवे स्थान गाठले आहे.थायलंड आणि नेदरलँड्स हे संघ सध्या तरी क्रमवारीत बाहेर पडले आहेत,कारण त्यांनी गेल्या तीन वर्षात आवश्यक असलेले किमान आठ एकदिवसीय समाने खेळलेले नाहीत.क्रमवारीत पुन्हा स्थान मिळवण्यासाठी थायलंडला आणखी एका,तर नेदरलँड्सला आणखी दोन एकदिवसीय समान्यांची आवश्यकता आहे,असेही या प्रसिद्धपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.